लोकशाही सशक्तीकरणात युवकांची भूमिका महत्वाची, राज्य निवडणूक आयुक्त ज़ स़ सहारिया यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:03 PM2018-02-08T12:03:36+5:302018-02-08T12:12:18+5:30
लोकशाही सशक्त होण्यासाठी तरुणाईची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहरिया यांनी आज येथे केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. ७ : लोकशाही सशक्त होण्यासाठी तरुणाईची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहरिया यांनी आज येथे केले.
सोलापूर विद्यापीठातर्फे लोकशाही पंधरवडा कार्यक्रमात लोकशाही, निवडणुका आणि सुशासन या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उदघाटनाच्या भाषणात जे़ स़ सहारिया बोलत होते. सोलापूर विद्यापीठातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रभारी कुलगुरु नितीन करमळकर, राज्य निवडणुक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, कुलसचिव डी.आर. मंझा आदी उपस्थित होते.
सहारिया म्हणाले, भारतीय लोकशाही सशक्त आणि अधिक मजबूत होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढायला हवी. नवीन आणि तरुण मतदांरानी यासाठी पुढाकार घ्यायलय हवा. तरुणांनी मतदार यादीत नांवनोंदणी तर करायला हवी. त्याचबरोबर मतदानाचा हक्क बजावयाला हवा. लोकशाही बळकट होण्यासाठी तरुणांच्या बरोबरच विद्यापीठे महत्वाची भूमिका बजावू शकतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप म्हणावे तितके संशोधन झालेले नाही. अशा प्रकारचे संशोधन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आयुक्त ज.स. सहारिया यांनी केले.
मतदार यादीत आपले नांव आहे का हे प्रत्येक नागरिकांने तपासायला हवे. मतदार यादी अद्यावत करण्याचे काम सतत सुरु असते. नागरिकांनी दुबार मतदार नांवनोंदणी स्वत:हून कमी करावी. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीचे नांव कमी करावे. प्रत्येक तरुणाने आपले नांव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि प्रसार माध्यमे या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदिश मोरे आणि सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी सहभागी झाले.
सायंकाळच्या सत्रात निवडणूक आयोगाचे सचिन शेखर चन्ने यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राचे संयोजन डॉ. रवींद्र चिंचोळकर यांनी केले.