मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहण्यास जबरदस्ती करणाऱ्या रोमियोला अटक
By विलास जळकोटकर | Published: May 11, 2024 05:37 PM2024-05-11T17:37:54+5:302024-05-11T17:38:30+5:30
सोलापूर : हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून येऊन काऊंटरच्या बाजूला बसलेल्या एका रोमियोनं अल्पवीन बालिकेला स्वत:जवळच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ पाहण्याची जबरदस्ती ...
सोलापूर : हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून येऊन काऊंटरच्या बाजूला बसलेल्या एका रोमियोनं अल्पवीन बालिकेला स्वत:जवळच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ पाहण्याची जबरदस्ती केली. आरडाओरडा झाल्यानं तो पळाला मात्र वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. अहेमद जकेरिया मोहम्मद अयुब शेख (वय २५, व्यापारी, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, यातील अल्पवयीनव फिर्यादीच्या बहिणीची मैत्रीण शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामास आहे. फिर्यादी रिसेप्शन काऊंटरजवळ अभ्यास करीत बसलेली होती.. सायंकाळी सहाच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखवायचे आहे असा बहाणा करुन एक तरुण आला. त्याने पिडितेला विचारणा करता डॉक्टर सायंक़ाळी ७ वाजता येतात म्हणून सांगितले.
पीडितेने त्याला सांगूनही तेथेच थांबला आणि आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहण्यास त्याने जबरदस्ती केली. काही क्षणातच पीडितेला अश्लील व्हिडीओ असल्याचे लक्षात आले तरी नमूद आरोपी तो पाहण्यासाठी जबरदस्ती करीत होता. दरम्यान फिर्यादी बालिकेने बहिणी मैत्रीण असलेल्या नर्सला ओरडून बोलावून घेतले. घाबरुन सदरची माहिती सांगितली.
तातडीने नर्सने बाहेर येऊन चौकातल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने नमूद रोमियोला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जेलरोड पोृलीस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. आरोपीविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास सपोनि ज्योत्सना भांबिष्टे करीत आहेत.
मोबाईल जप्त; न्यायालयीन कोठडी
जेलरोड पोलिसांनी पीडित फिर्यादीचा जबाब नोंदवून पेशंट म्हणून आलेल्या नमूद रोमियोकडून मोबाईल जप्त केला. तपासानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. सोलापूरच्या न्यायालयात उभे केले. त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.