coronavirus; सोलापुरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील रूटिन शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:45 AM2020-03-23T11:45:10+5:302020-03-23T11:49:01+5:30

सर्जिकल सोसायटी घेतला निर्णय; भाजलेले रुग्ण, अपघात, प्रसूती, लहान मुलांवरील उपचार मात्र सुरुच

Routine surgeries at government and private hospitals in Solapur were postponed | coronavirus; सोलापुरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील रूटिन शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

coronavirus; सोलापुरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील रूटिन शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

googlenewsNext
ठळक मुद्दे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय- रूग्णालयातील गर्दी टाळण्यासाठी रूटिन शस्त्रक्रिया थांबविल्या- खासगी रूग्णालयाने देखील दिला सर्जिकल सोसायटीच्या आवाहनाला प्रतिसाद

सोलापूर : शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयातील रुटिन शस्त्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सोलापूर सर्जिकल सोसायटीने केलेल्या आवाहनाला शासकीय व खासगी रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी देश सरसावला आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णालयातील सेवा मात्र सुरु असणार आहे. यादरम्यान रु ग्णालयात होणाºया रुटिन शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. खासगी रुग्णालयात एखादा कोरोना आजाराचा रुग्ण जाऊ शकतो. यामुळे इतर रुग्णांना या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सर्जिकल सोसायटीतर्फे हा निर्णय घेतला आहे. शहरामध्ये सुमारे २५ ते ३० रुग्णालयांत शस्त्रक्रिया करण्यात येतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रोज १४ ते २५ साध्या शस्त्रक्रिया व १४ सिझर होतात. एखादी गाठ शस्त्रक्रिया करुन काढणे, हर्नियाची शस्त्रक्रि या, थॉयराईड, हायड्रोसिल, लॅकोमा, पायातील रॉड काढणे यासारख्या रुटिन शस्त्रक्रिया ज्या पुढील काळात करता येऊ शकतात. अशाच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयात होणाºया आपत्कालीन शस्त्रक्रियादेखील बंद करण्यात आल्या असून, या शस्त्रक्रिया फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात करण्यात येणार आहेत. भाजलेले रुग्ण, अपघात, प्रसूती, लहान मुलांवरील उपचार मात्र सुरुच असणार आहेत.

कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये, ही यामागची भूमिका असून, रुग्णालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी रुटिन शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांत होणाºया आपत्कालीन शस्त्रक्रिया या शासकीय रुग्णालयात करण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयेदेखील या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत.

- डॉ. औदुंबर मस्के, अध्यक्ष, सोलापूर सर्जिकल सोसायटी. 




 

Web Title: Routine surgeries at government and private hospitals in Solapur were postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.