आरपीएफच्या जवानांनी वाचवले ८६ जणांचे प्राण, सोलापुरातील सहा जणांचा समावेश
By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 15, 2023 12:23 PM2023-04-15T12:23:37+5:302023-04-15T12:24:16+5:30
रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफच्या जवानांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे जीव वाचले असून रेल्वे बोर्डाने आरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे.
सोलापूर : मिशन जीवन रक्षक या मोहिमेतंर्गत मध्य रेल्वे विभागाने वर्षभरात ८६ जणांना जीवनदान दिले असून यात सोलापूर विभागातील सहा प्रवाशांचा समावेश आहे. रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफच्या जवानांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे जीव वाचले असून रेल्वे बोर्डाने आरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे.
रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटना कैद झाल्या असून या घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ८६ घटनांपेक्षा ३३ घटना या मुंबई विभागातील आहेत. आरपीएफमुळे मुंबई विभागात एकूण ३३ लोकांचा जीव वाचला आहे. नागपूर विभागात १७, पुणे १३ तसेच भुसावळ विभागात १७ तसेच सोलापूर विभागात सहा प्रवाशांचा जीव वाचला आहे.