जयहिंदतर्फे ऊस उत्पादकांच्या खात्यात २१०० रुपये जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:34+5:302021-02-06T04:40:34+5:30
गणेश माने-देशमुख म्हणाले, यावर्षी जयहिंदचा गळीत हंगाम ६ नोव्हेंबरपासून सुरू झाला. ६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत गाळपास आलेल्या शेतकऱ्यांच्या ...
गणेश माने-देशमुख म्हणाले, यावर्षी जयहिंदचा गळीत हंगाम ६ नोव्हेंबरपासून सुरू झाला. ६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत गाळपास आलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसापोटी २१०० रुपये प्रतिटन असलेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. २६ नोव्हेंबर पासून १४ जानेवारीपर्यंत गाळपास आलेल्या ऊसापोटी बिल अदा करण्यात येत आहे. प्रत्येक टप्प्यात पाच दिवसांचे नियोजन आहे. दर पाच दिवसांनी एक हप्ता याप्रमाणे बिल अदा केले जात आहे. विशेष म्हणजे १५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीतील बिल अदा केले आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस जयहिंद शुगर्सला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन गणेश माने-देशमुख यांनी केले आहे.
१ फेब्रुवारीनंतर १०० रुपये अधिकचा दर
१ फेब्रुवारीनंतर गाळपास येणाऱ्या ऊसाला २१०० आणि वाढीव १०० असे एकूण २२०० प्रतिटन दर देणार आहोत .विशेष म्हणजे १ फेब्रुवारीपासून ऊस आल्यानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची यंत्रणा उभी केल्याचे मार्गदर्शन बब्रुवान माने-देशमुख यांनी सांगितले.