झेडपी शाळा बांधकामासाठी २४ कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:05+5:302021-06-22T04:16:05+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस नवीन वर्ग खोली मंजुरीस प्रस्ताव सादर करताना विद्यार्थी पटसंख्या, शिक्षक संख्या त्यास अनुसरून आवश्यक वर्गखोली ...

Rs 24 crore sanctioned for construction of ZP school | झेडपी शाळा बांधकामासाठी २४ कोटी रुपये मंजूर

झेडपी शाळा बांधकामासाठी २४ कोटी रुपये मंजूर

Next

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस नवीन वर्ग खोली मंजुरीस प्रस्ताव सादर करताना विद्यार्थी पटसंख्या, शिक्षक संख्या त्यास अनुसरून आवश्यक वर्गखोली संख्येबाबत खात्री करून आरटीई ॲक्टनुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवीन वर्गखोली इमारतीचे अंदाजपत्रक शासनाकडील सुधारीत डीएसआर रकमेनुसार तयार करण्याबाबत बांधकाम विभाग तसेच ज्या जि. प. प्राथमिक शाळेची इमारत (वर्ग खोली) मोडकळीस आली आहे, त्याठिकाणी नवीन वर्गखोली अशा इमारतीचे बांधकाम विभागामार्फत तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याबाबत सांगितले.

एक पद, एक वृक्ष उपक्रम

सर्व शिक्षा अभियानकडील शाखा अभियंत्यांना नियमित कामकाज सांभाळून जि. प. कडील इमारत दुरुस्ती व नवीन इमारत बांधकामाच्या कामकाजावर देखरेख व सनियंत्रण करण्यास मान्यता मिळविण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे ठरले. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक, प्राथमिक, जिल्हा परिषद, खासगी शाळेमधील पटांगणामध्ये प्रत्येक शिक्षकामार्फत वृक्षलागवड व संगोपन करण्याबाबत ‘एक पद, एक वृक्ष’ उपक्रम राबविण्याचे ठरले.

Web Title: Rs 24 crore sanctioned for construction of ZP school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.