१३ रस्त्यांसाठी अडीच कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:22 AM2021-05-18T04:22:57+5:302021-05-18T04:22:57+5:30
अक्कलकोट : ग्रामीण भागातील पायाभूत विकासास महत्त्वाचा घटक असलेल्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. विकास निधीतून तेरा रस्त्यांच्या सुधारणांसाठी ...
अक्कलकोट : ग्रामीण भागातील पायाभूत विकासास महत्त्वाचा घटक असलेल्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. विकास निधीतून तेरा रस्त्यांच्या सुधारणांसाठी २ कोटी ६० लाख रुपये निधी प्राप्त झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
ही कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाद्वारे केली जाणार आहेत. ३०५४ योजनेतून रामपूर ते राज्यमार्ग (१५ लाख), मैंदर्गी ते जकापूर (२५ लाख), दुधनी ते निंबाळ (२५ लाख), तडवळ ते सुलेरजवळगे (२० लाख), आळगे ते तडवळ (२० लाख), पितापूर ते अकतनाळ (२२ लाख), धोत्री ते बोरामणी (१८ लाख), कासेगाव ते खडकी (१५ लाख), बोरामणी ते दावलमलिक रस्ता (१५ लाख), फताटेवाडी ते तिल्लेहाळ (१० लाख) या रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.
नागणसुर ते व्हसुर (२५ लाख), हंजगी ते अक्कलकोट (१५ लाख), बोरामणी ते अरळी (३५ लाख) या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. या मंजूर निधीतून संबंधित गावांतील रस्त्याचे खडीकरण, भराव, डांबरीकरण आदी कामे केली जाणार आहेत. यापूर्वी ग्रामीण रस्त्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी मिळाला आहे. आता पुन्हा १३ रस्त्यांसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यातून निधी उपलब्ध होतोय. यामुळे तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
----