रिझर्व्ह बँकेकडून ३१० कोटींचा अतिरिक्त निधी गारपीट अनुदान; सोलापूर जिल्ाच्या मागणीची झाली पूर्तता
By admin | Published: May 7, 2014 04:32 PM2014-05-07T16:32:16+5:302014-05-07T19:16:29+5:30
सोलापूर:
सोलापूर:
रिझर्व्ह बँकेने भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखेला ३१० कोटींचा अतिरिक्त पुरवठा केल्याने गारपीटग्रस्त शेतकर्यांना पैसे मिळण्याची अडचण दूर झाली आहे. जिल्हा बँकेलाही पैसे दिले असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ातील गारपीट पीक नुकसानीची रक्कम मिळत नसल्याच्या शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. विशेषत: जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकर्यांना पैसे दिले जात नसल्याची तक्रार आहे. लोकसभा निवडणूक व गारपीट अनुदान वाटप एकाच वेळी आल्याने निधी उपलब्ध करण्यासही रिझर्व्ह बँकेला अडचण झाली होती. शेतकर्यांची बँक खाती जिल्हा बँकेत असल्याने गारपीट अनुदानाची रक्कमही याच बँकेत जमा होणार आहे. जिल्हा बँकेने यासाठी भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखेकडे ४०० कोटींची तर बँक ऑफ इंडियाकडे १०० कोटींची मागणी केली होती. रिझर्व्ह बँकेकडूनच पैसे मिळत नसल्याची अडचण ट्रेझरी शाखेसमोर होती. ती अडचण आता दूर झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सोलापूरसाठी अतिरिक्त ३१० कोटी रुपये दिले असून ही रक्कम गारपीट व दुष्काळी मदत वाटपासाठी उपयोगी पडणार आहे. जिल्हा बँकेला मागील आठवड्यात ५५ कोटी रुपये ट्रेझरी शाखा व अन्य बँकेने दिले होते.
-----------------
आता पैसे शिल्लक..अनुदान येईना?
गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची घाई लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान होती. जिल्हाधिकार्यांच्या दबावामुळे तहसीलदारांनी घाईने बँकांना धनादेश दिले, परंतु बँकांकडे खातेदाराला देण्यासाठी पैसेच नव्हते. आता रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त ३१० कोटी रुपये दिले असले तरी आता तहसीलदारांकडून बँकांना धनादेश दिले जात नाहीत. दुष्काळाची २६८ कोटींची मदत वाटप करावयाची असली तरी तहसीलची यंत्रणा काही केल्या हलेना झाली आहे. गारपीट नुकसानीच्या तिसर्या हप्त्याची ७२ कोटींची रक्कमही शासनाकडून मिळेना झाली आहे. त्यामुळे आता बँकांकडे पैसे शिल्लक असले तरी यंत्रणेकडून धनादेश व शेतकर्यांची यादी मिळेना झाली आहे.