विविध विकासकामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर : शहाजीबापू पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:40+5:302021-08-23T04:24:40+5:30

यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी नगराध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, ...

Rs 5 crore sanctioned for various development works: Shahajibapu Patil | विविध विकासकामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर : शहाजीबापू पाटील

विविध विकासकामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर : शहाजीबापू पाटील

googlenewsNext

यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी नगराध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, ॲड. उदयबापू घोंगडे, गटनेते सोमनाथ लोखंडे, नगरसेवक सोमेश यावलकर, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, आनंद घोंगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भोरे उपस्थित होते.

आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगोला येथील धान्य बाजार येथे शॉपिंग सेंटर व महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई सुधारणा, नवीन बहुउद्देशीय सभागृह बांधणे, वंदे मातरम् चौक ते मिरज रेल्वे गेटपर्यंत बायपास रस्ता काँक्रिटीकरण करणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह नूतनीकरण यासह नगरपरिषद कार्यालय फर्निचर, आदी कामांसाठी निधीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, तर उर्वरित कामांसाठी लवकरात लवकर निधी दिला जाईल, असा शब्द त्यांनी दिल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

फोटो ओळ :::::::::::::

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पत्रकार परिषदेस उपस्थित माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, प्रा. पी. सी. झपके, भाऊसाहेब रुपनर, तानाजी पाटील, रफिक नदाफ, आदी उपस्थित होते.

Web Title: Rs 5 crore sanctioned for various development works: Shahajibapu Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.