आर.टी.ई. प्रवेश फॉर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:10+5:302021-03-21T04:21:10+5:30

बार्शी : सहजीवन संस्थेच्या वतीने आर.टी.ई. प्रवेशाची मुदत कोरोना महामारीमुळे वाढविण्याची मागणी निवेदनाद्वारे बार्शी तहसीलदार यांच्याद्वारे मुख्यमंत्री ...

R.T.E. Admission Form | आर.टी.ई. प्रवेश फॉर्म

आर.टी.ई. प्रवेश फॉर्म

Next

बार्शी : सहजीवन संस्थेच्या वतीने आर.टी.ई. प्रवेशाची मुदत कोरोना महामारीमुळे वाढविण्याची मागणी निवेदनाद्वारे बार्शी तहसीलदार यांच्याद्वारे मुख्यमंत्री व राज्याचे शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांना देण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे, सचिव सुहास कांबळे, पालक अभिजित शिंदे, दत्ता पाटील, सागर केसरे, रवी चव्हाण, किशोर कांबळे आदी उपस्थित होते.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आर.टी.ई.) मधून प्रवेश दिला जातो; परंतु सध्या कोरोना महामारीमुळे अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू लागू असल्याने स्थानिक प्रशासनाचे आदेश आणि वाढती रुग्णांची संख्या तसेच आपल्या ऑनलाइन प्रणालीच्या तांत्रिक अडचणीमुळे पालकांना ऑनलाइन फॉर्म भरणे अडचणीचे ठरत आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आर.टी.ई.ची प्रवेश संख्या ९६,६८१ असून, १,७७,६३२ फॉर्म पालकांनी भरलेले आहेत. त्याप्रमाणे फॉर्म भरण्याची मुदत ही ३० मार्चपर्यंत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता, ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवावी. ज्यामुळे जास्तीत जास्त पालकांना पर्यायाने विद्यार्थ्यांना आर.टी.ई चा लाभ मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: R.T.E. Admission Form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.