सोलापूरच्या आरटीओचा महसूल १५७ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:10 PM2018-04-02T15:10:04+5:302018-04-02T15:10:04+5:30

आरटीओ कार्यालयाचा महसूल १५७ कोटींवर गेला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली. 

RTO revenue of Solapur is 157 crores | सोलापूरच्या आरटीओचा महसूल १५७ कोटींवर

सोलापूरच्या आरटीओचा महसूल १५७ कोटींवर

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा आरटीओ कार्यालयाचा महसूल १५७ कोटी ८५ लाख ९२ हजार रुपयेआरटीओ कार्यालयास १४0 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते यंदा उद्दिष्टापेक्षा १८ कोटी जादा महसुली उत्पन्न मिळाले

सोलापूर : मार्चअखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू राहिले. यावर्षी आरटीओ कार्यालयाचा महसूल १५७ कोटींवर गेला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली. 

आर्थिक वर्षाखेर असल्याने शनिवारी शासकीय कार्यालये उशिरापर्यंत सुरू होती. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची कार्यालयीन वेळ संपल्यावर सायंकाळी उशिरार्पंत हिशोब सुरू होता. बँकांनी सायंकाळी सात वाजेपर्यंत रोकड भरण्याची मुदत दिली होती. त्यामुळे कर्मचाºयांनी हे काम आटोपून सर्व खात्यांकडून जमा झालेला महसूल बँकेत खात्यावर जमा केला.

यंदा आरटीओ कार्यालयाचा महसूल १५७ कोटी ८५ लाख ९२ हजार रुपये झाला आहे. आरटीओ कार्यालयास १४0 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा उद्दिष्टापेक्षा १८ कोटी जादा महसुली उत्पन्न मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वी आरटीओ कार्यालयाचा महसूल ९६ कोटी जमा झाला होता. यावर्षी रिक्षा परमिट खुले झाले.

परमिटसाठी १0 हजार रुपये नोंदणी फी ठेवण्यात आली आहे. परमिट घेतलेल्या सुमारे १६२३ जणांनी रिक्षा घेतल्या. यामुळे यातून ४ कोटी महसूल वाढला आहे. आरटीओ कार्यालयात जमा झालेला कर पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये मोटार नोंदणी फी: १९ कोटी ५१ लाख ३१ हजार ६८९ रु., सेवा शुल्क: ६0 हजार, दंड: २२ कोटी ५२ लाख, एकरकमी कर व तडजोड दंडाची वसुली: ११२ कोटी ८७ लाख, पर्यावरण कर: ८ लाख ४६ हजार, रस्ता सुरक्षा कर: १ कोटी ८६ लाख़ 

Web Title: RTO revenue of Solapur is 157 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.