रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस डायरिया, गोवर लसींमुळे मुलांना होणारे आजार आटोक्यात

By appasaheb.patil | Published: March 16, 2019 01:17 PM2019-03-16T13:17:33+5:302019-03-16T13:25:18+5:30

जागतिक लसीकरण दिवस

Rubella, polio, tetanus, rotavirus diarrhea, and immunization due to vaccines. | रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस डायरिया, गोवर लसींमुळे मुलांना होणारे आजार आटोक्यात

रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस डायरिया, गोवर लसींमुळे मुलांना होणारे आजार आटोक्यात

Next
ठळक मुद्देलसीकरणाअभावी लहान मुलांना वर्षभरात विविध आजारांचा सामना करावा लागतो. शासकीय लसीकरण मोहिमेनुसार विविध मनपा आरोग्य केंद्रावर तसेच घरोघर जाऊन राबविल्या जाणाºया मोहिमेत लसी दिल्या जातातरुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस, गोवर लसींमुळे लहान मुलांना होणारे ९० टक्के आजार आटोक्यात

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : लसीकरणाअभावी लहान मुलांना वर्षभरात विविध आजारांचा सामना करावा लागतो. शासकीय लसीकरण मोहिमेनुसार विविध मनपा आरोग्य केंद्रावर तसेच घरोघर जाऊन राबविल्या जाणाºया मोहिमेत लसी दिल्या जातात. सध्या शासकीय यंत्रणा व खासगी रुग्णालयात देण्यात येणाºया रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस, गोवर लसींमुळे लहान मुलांना होणारे ९० टक्के आजार आटोक्यात आले आहेत, मात्र १० टक्के पालक लसीकरण अर्धवट सोडत असल्यामुळे त्याचा मुलांवर दूरगामी परिणाम होत असल्याची खंत बालरोगतज्ज्ञ डॉ़ अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. १ वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. गोवरच्या लसीबरोबर अ जीवनसत्वाचा पहिला डोस देणे गरजेचे आहे. सहज उपलब्ध असलेल्या रोगप्रतिकारक लसींचा वापर न केल्यामुळे दरवर्षी १.७ दशलक्ष मुले विविध रोगांना बळी पडतात. लसीकरण केलेल्या मुलामुलींचा अशा प्राणघातक रोगांपासून किंवा त्यांच्यामुळे उद्भवणाºया विकृतींपासून बचाव होतो. लसीकरण मिळणे हा प्रत्येक बाळाचा हक्क आहे. प्रत्येक मुलामुलीचे लसीकरण करणे गरजेचे आहे. गर्भवतीचे व तिला होणाºया बाळाचे धनुर्वात उर्फ टिटॅनसपासून रक्षण होण्यासाठी लसीकरण आवश्यक असते. सध्या बाजारात ४०० रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंतच्या लसी खासगी रुग्णालयात मिळू लागले आहेत़ 

आजार व वयानुसार दिली जाणारी लस

  • - बाळ जन्मल्यानंतर २४ तासांत बीसीजी, झीरो पोलिओ आणि झीरो हिपॅटायटिस
  • - दीड महिन्याचे झाल्यावर धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला यांची त्रिगुणी लस याशिवाय मेंदुज्वर 
  • - वय वर्षे दीड ते साडेतीन वर्षांतील बालकांसाठी इंजेक्शन पोलिओ
  • - नवव्या महिन्यानंतर गोवरची लस, एमएमआर, मम्स, रुबेला. याच दरम्यान टायफाईडची लस दिली जाते़
  • - साडेचार ते पाच वर्षात डीपीटीचा दुसरा बुस्टर डोस
  • - नवव्या महिन्यापासून दर सहा महिन्यांनी जीवनसत्वाची मात्रा ६ व्या वर्षापर्यंत
  • - रोटाव्हायरस डायरियाची लस दिल्यास अतिसार, जुलाब, उलट्यांना आळा बसतो. टायफाईड न्यूमोनियासारख्या आजारांपासून बचाव करता येतो.
  • - सर्व्हाईकल कॅन्सरचे लसीकरण नसल्यास गर्भपिशवीचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते.

या आहेत नव्या लसी
- मेंदुज्वर लस, रोटाव्हायरस डायरियाची लस, कावीळ अ लस, न्यूमोनिया लस, टायफाइड लस, एमएमआर (गोवर, गालफुगी आणि रुबेलाचा समावेश असलेली लस), चिकनपॉक्स (कांजण्याची लस), व्हायरल फ्लू लस, सर्व्हाईकल कॅन्सर लस़ 

गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी नवी लस

  • - अलीकडच्या काळात महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे़ याशिवाय दरमहा १२५ ते १५० महिला कर्करोगाने ग्रस्त असल्याचे निदान होत आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांचा आकडा वेगळा आहे. या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी वयोगट ९ ते ११ वर्षातील मुलीसाठी ‘एचपीव्ही’(हिंदुस्थान, पुना, विशाखापट्टणम) ही लस बाजारात आली आहे़ या लसीमुळे महिलांना होणाºया गर्भाशयाच्या कॅन्सरवर मात करण्यात डॉक्टरांना यश येत आहे़ 

सर्व पालकांना, बाळाचे लसीकरण कशासाठी, केव्हा, कोठे व कसे करावे याची माहिती असायला हवी. मूल आजारी असले, त्याला काही व्यंग असले किंवा ते कुपोषित असले तरी देखील त्याचे लसीकरण करणे सुरक्षित आहे ही बाब पालकांना माहीत असणे गरजेचे आहे. वाढत्या आजारांच्या बचावासाठी मुलांसाठी लसीकरण करणे काळाची गरज आहे़
- डॉ़ अतुल कुलकर्णी
बालरोगतज्ज्ञ, सोलापूर 

Web Title: Rubella, polio, tetanus, rotavirus diarrhea, and immunization due to vaccines.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.