अधिकारी बदलला की नियम..निकष बदलतात, उत्तर सोलापूर तालुक्याची दैनावस्था, निधी असूनही बंधाºयांची कामे होईनात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:46 AM2018-01-06T09:46:05+5:302018-01-06T09:47:58+5:30
कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत.
मागील तीन-चार वर्षांत पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. उत्तर तालुक्यातही अशी कामे होत असली तरी त्याला ब्रेक लावण्याचे काम शासकीय यंत्रणाच करीत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, शासनाचा लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागामार्फत पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याची कामे केली जातात. यासाठी तत्कालीन वरिष्ठ भू-वैज्ञानिक शक्यतो गावाच्या गरजेचा विचार करुन बंधारे बांधण्यास परवानगी देत असत. त्यामुळे बंधाºयांची कामे गरज असेल त्या ठिकाणी झाली होती. वरिष्ठ भू- वैज्ञानिकांची बदली झाली अन् नव्याने प्रभार घेतलेल्या अधिकाºयांनी जिल्हा परिषद व स्थानिक स्तर कार्यालयाने पाठविलेल्या अनेक बंधाºयांच्या जागा अयोग्य असल्याचे कळविले. त्यामुळे मागील वर्षी उत्तर तालुक्यातील अनेक ठिकाणचे बंधारे नाकारले गेले. याचा फटका अनेक गावांना बसला व पावसाचे पाणी अडविण्याची कामे झालीच नाहीत.
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तत्कालीन सोलापूर विभागाचे अधिकारी अशोक देसाई यांच्या कार्यपद्धतीचाही फटका बंधाºयांच्या कामांना बसला. त्यांनी नान्नज-बीबीदारफळ ओढ्यावर बंधारा बसत नसल्याचे सांगितल्याने बंधाºयाचे काम रद्द करावे लागले. त्यानंतर अकोलेकाटी-बीबीदारफळ-सावळेश्वर तसेच नान्नज-बीबीदारफळ -सावळेश्वर ओढ्यावर बंधाºयासाठी जागा अयोग्य असल्याचे सांगितले होते.
याप्रमाणेच तालुक्यातील अन्य गावातही विभागीय कृषी अधिकारी व वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामुळे अनेक ठिकाणी गरज असूनही बंधाºयांची कामे झाली नाहीत. गावागावात बंधाºयांची कामे करण्यासाठी जागा व पैसे असूनही अधिकाºयांच्या मनमानीमुळे कामे होत नाहीत.
-----------------------
नाकारलेल्या ठिकाणी मंत्र्यांचे पाणीपूजन
च्तत्कालीन विभागीय कृषी अधिकाºयांनी नान्नज- बीबीदारफळ ओढ्यावर बंधाºयासाठी जागा नाकारली होती. त्यामुळे बंधाºयाचे काम रद्द झाले. याच ठिकाणी स्थानिक स्तर विभागाने बांधलेल्या बंधाºयातून आजही पाणी वाहत आहे. या पाण्याचे पूजन नुकतेच जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले. अशाच पद्धतीने देसाई यांनी योग्य असल्याचे सांगितल्याने अकोलेकाटी- सावळेश्वर व नान्नज-सावळेश्वर ओढ्यावर दोन बंधारे सुचविले होते. त्याच जागेवर सध्याच्या अधिकाºयांच्या मते बंधारे होऊ शकत नाहीत.
--------------------
सरकार नकारात्मक...
च्बीबीदारफळ हद्दीत लोकमंगल उद्योग समूहाने केलेल्या चार बंधाºयामुळे बीबीदारफळच्या परिसराचे नंदनवन झाले आहे. याच ओढ्यावर मागील पाच वर्षांत शासनाला एकाही बंधाºयाचे काम करता आले नाही. अधिकारी बदलला की नियम बदलतात व बंधाºयांची कामे नाकारली जातात. तालुक्याला खमके नेतृत्व नसल्याने अधिकाºयांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे विकास कामाचे चांगभले होत आहे.