सोलापूर लोकसभा निवडणूक मतदार याद्या घेण्यासाठी कर्मचाºयांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:33 PM2019-03-16T14:33:26+5:302019-03-16T14:35:32+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदार यादी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाºयांची धावपळ दिसून येत ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदार यादी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाºयांची धावपळ दिसून येत आहे. ३१ जानेवारी अखेरपर्यंत असलेल्या मतदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असूनल त्याचे वितरण करण्याचे काम सुरू झाले आहे. जानेवारीनंतर वाढलेल्या मतदारांची यादी नंतर वाढीव पुरवणी यादीतून देण्यात येत आहे.
सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच माढा लोकसभेची निवडणूक घेण्यात येत आहे. या दोन्ही मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले आहे. मतदार यादी तपासून घेऊन ती ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी मतदार कर्मचाºयांची गर्दी होताना दिसून येत आहे.
दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंत ३२ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. जानेवारीपासून नवीन मतदारांची नोंदणी करण्याची मोहीम घेण्यात आली होती. या मोहिमेत आणखीन सुमारे ३५ हजार मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. नवीन मतदार नोंदणी करण्याची प्रक्रिया उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापूर्वी दहा दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे वाढ झालेल्या नवीन मतदारांची यादी पुन्हा एकदा निवडणूक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.