घोटभर पाण्यासाठी धावपळ ठरतेय जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:45+5:302021-05-08T04:22:45+5:30
माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तरीही ग्रामीण भागात वाढदिवस व लहान-मोठे कार्यक्रम निर्धास्तपणे सुरू असतात. याशिवाय ...
माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तरीही ग्रामीण भागात वाढदिवस व लहान-मोठे कार्यक्रम निर्धास्तपणे सुरू असतात. याशिवाय दैनंदिन गरजांबरोबरच सध्या जाणवत असलेली पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरणार आहे. अवेळी व कमी स्वरूपात होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक पाणी भरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. यावेळी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगसह कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली होत आहे.
गावकऱ्यांचे सहकार्य ठरणार मोलाचे
ग्रामीण भागातील कृषी व्यवसायामुळे नागरिकांची गर्दी व संपर्क वाढत आहे. यातच लहान-मोठे कार्यक्रम व जीवनावश्यक गोष्टींचा फटका बसत आहे. यामुळे गाव कारभाऱ्यांनी पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नागरिकांनी पालन करण्यासाठी सक्ती करणे आवश्यक आहे.
फोटो ::::::::::::::::::::
जळभावी (ता. माळशिरस) गावात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे नागरिक पिण्याचे पाणी भरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.