सरपंचपदी रूपाली घाडगे; उपसरपंचपदी नंदाबाई सोनटक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:26 AM2021-03-01T04:26:05+5:302021-03-01T04:26:05+5:30
सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण असून सरपंच पदासाठी भालके-शिंदे गटातून अनुसया डुबल तर परिचारक गटातून रूपाली घाडगे, उपसरपंच पदासाठी भालके-शिंदे ...
सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण असून सरपंच पदासाठी भालके-शिंदे गटातून अनुसया डुबल तर परिचारक गटातून रूपाली घाडगे, उपसरपंच पदासाठी भालके-शिंदे गटातून नंदाबाई सोनटक्के तर परिचारक गटातून वर्षा डुबल यांनी अर्ज दाखल केले होते. भालके-शिंदे गटाच्या अनुसया डुबल यांना ९ पैकी ४ तर परिचारक गटाच्या रूपाली घाडगे यांना ९ पैकी ५ मते मिळाल्याने एका मताने परिचारक गटाच्या रूपाली घाडगे या निवडून आल्या आहेत. मात्र उपसरपंचपदी भालके-शिंदे गटाच्या नंदाबाई सोनटक्के यांना ९ पैकी ५ तर परिचारक गटाच्या वर्षा डुबल यांना ९ पैकी ४ मते मिळाली. यामध्ये भालके-शिंदे गटाच्या नंदाबाई सोनटके या एका मताने निवडून आल्या असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंडलिक गावडे यांनी जाहीर केले आहे.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम डुबल, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, एकनाथ डुबल, तानाजी शिरगिरे, संभाजी डुबल, अजिंक्य घाडगे, आण्णासाहेब डुबल, पोपट डुबल, हनुमंत घाडगे, कांतीलाल डुबल, बंडू डुबल, कल्याण बंगाळे, दत्तात्रय गाडे, काकासो कांबळे, समाधान रणदिवे, हनुमंत शिरगिरे, नवनाथ घाडगे, नागनाथ शिरगिरे, ग्रामसेवक समाधान कांबळे आदी उपस्थित होते.
अजिंक्य घाडगे ठरले किंगमेकर
गेल्या तीस वर्षांपासून भालके-शिंदे गटाचा बालेकिल्ला मानला जाणारा एक नंबर वार्ड हा परिचारक गटाचे उद्योजक अजिंक्य घाडगे यांनी खेचू आणला आहे. यामुळे एक नंबर वार्डाचे अजिंक्य घाडगे हे किंगमेकर ठरले आहेत.