जेऊरचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:00+5:302021-04-19T04:20:00+5:30
जेऊर येथे कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप ढेले यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी फोनवरून मागणी केली होती. तेव्हा ...
जेऊर येथे कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप ढेले यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी फोनवरून मागणी केली होती. तेव्हा डॉ. ढेले यांनी वीज आणि स्वच्छतेची अडचण सांगत दोन दिवसांत सगळी व्यवस्था करतो, असा शब्द आपण दिला होता आणि त्यांनी यंत्रणेला आदेश देऊन पूर्ण केला.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य अतुल पाटील, जेऊर सरपंच भारत साळवे, अंगद गोडसे, भास्कर कांडेकर, विनोद गरड, धनंजय शिरस्कर, राजशेठ गादिया, शांताराम सुतार, बापू घाडगे, संतोष वाघमोडे, सुलेमान मुल्ला, राजेंद्र जगताप, मुबारक शेख, धनंजय घोरपडे, रामभाऊ जगताप, ग्रामसेवक यशवंत कुदळे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
श्रेय लाटण्यासाठी आमदारांचा खटाटोप
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आमदार मात्र पंढरपूरच्या निवडणुकीत मश्गुल होते. हे सर्व तालुकावासीय जाणून आहेत.
जेऊर येथील शासनमान्य कोविड सेंटर हे ३० बेडचे असून याचा लाभ जेऊर परिसरातील गावातील रुग्णांना होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.