मुळेगांव तांड्यावर ग्रामीण पोलीसांची धाड, २१ हजार लिटर रसायन नष्ट, तिघे ताब्यात
By admin | Published: April 3, 2017 05:41 PM2017-04-03T17:41:58+5:302017-04-03T17:41:58+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून १०५ बॅरलमधील २१ हजार लिटर हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने नष्ट केले़ उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली़
याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी विजय मल्लु राठोड,विजय शंकर राठोड, विलास तेजु चव्हाण या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामीण पोलिसांनी मुळेगाव तांडा येथे छापा टाकून १०५ बॅरलमधील २१ हजार लिटर रसायन नष्ट केले. ते रसायन ४ लाख ६६ हजार २०० रुपयांचे होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू , अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी अभय डोंगरे,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सपोनि उमेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव म्हेत्रे, विकास घुगे आदींनी ही कामगिरी केली.