सोलापूरजवळील मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:15 PM2018-02-09T13:15:10+5:302018-02-09T13:16:09+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
ग्रामीण भागातील अवैध धंद्यावर कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेचे उमेश धुमाळ आणि त्यांच्या पथकाला मुळेगाव तांडा येथील चिंतामणी नगर येथे अवैधरित्या जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी छापा टाकून ३१ हजार रुपयांची रोकड, ५ मोबाईल व १४ दुचाकी असा एकूण ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले तर दहा जण पळून गेले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उमेश धुमाळ, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे, सचिन वाकडे, प्रेमेंद्र खंडागळे, अमोल गावडे, सागर शिंदे, सचिन मागडे आदींनी कामगिरी केली.