अवकाळीमुळे रुसला फळांचा राजा, गोडी चाखण्यासाठी यंदा जादा पैसे मोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 02:39 PM2021-04-12T14:39:39+5:302021-04-12T14:39:53+5:30

अवकाळी पावसाचा परिणाम : बदलत्या हवामानात आवक ४० टक्क्यांनी घटली

Rusla, the king of fruits, has to pay extra this year to taste sweets | अवकाळीमुळे रुसला फळांचा राजा, गोडी चाखण्यासाठी यंदा जादा पैसे मोजा

अवकाळीमुळे रुसला फळांचा राजा, गोडी चाखण्यासाठी यंदा जादा पैसे मोजा

googlenewsNext

सोलापूर : दरवर्षी पाडव्याला आंब्याची सर्वाधिक विक्री होते. कोरोना, अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे आवक ४० टक्क्यांनी घटली. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले असून, यंदा पाडव्याला वाढीव दरातच आंबा खरेदी करावा लागेल. गेल्यावर्षी या काळात आंब्याची किंमत ५०० ते ७०० रुपये डझन इतकी होती. एप्रिलच्या मध्यापर्यंत साडेतीनशे रुपयांपर्यंत खाली उतरणारे आंब्याचे दर यंदा सातशे ते अकराशे रुपये डझन इतकेच राहिले आहेत. एप्रिल मध्यावर आला तरीही आंब्याचे दर चढेच आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंब्याचे भाव थोडे खाली उतरतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सध्या शहरात बार्शी, अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर या ठिकाणासह कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई, कर्नाटक, हैदराबाद येथून आंब्याची आवक होत आहे. यामध्ये देवगड हापूस, लालबाग, बदाम, केशर आणि कर्नाटक हापूस आंब्याची आवक होते. मे महिना आणि पावसाळ्याच्या सुरुवातीस नीलम, तोतापुरी, लाटी, मलेशा हे आंबे बाजारात दखल होत असतात.

फळं गळून पडली

अवकाळी पाऊस, हवामानात होणाऱ्या बदलामुळे आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. वाढलेल्या तापमानाचा फटका आंब्याला बसला. उन्हाच्या तीव्र झळांनी आंबे गळून पडले. परिणामी आवक घटली, अशी माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्याने दिली.

व्यापाऱ्यांसमोर आव्हान

उन्हाचा पारा ४० डिग्रीच्या वर गेलेला असून, उन्हाचा दाह जाणवत आहे, कच्चा आंबा पंधरा दिवस राहू शकतो. मात्र, तयार आंबा दोनपेक्षा जास्त दिवस राहू शकत नसल्याने शेतकऱ्यांकडून आलेला आंबा पिकवणे आणि टिकवण्याचे आव्हान व्यापाऱ्यांसमोर आहे.

असे आहेत दर

  • देवगड हापूस- ७००-११००
  • कर्नाटक हापूस १००-१२०
  • केशर १८०-२००
  • लालबाग ८०-१००
  • बदाम ६०-८०

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात आंब्याची आवक ४० टक्के कमी आहे, त्यामुळे दर वाढले असले तरीदेखील मागणीत वाढ आहे. कडक निर्बंधांमुळे ऑनलाइन पद्धतीने आंबा विक्रीकडे कल वाढू लागला आहे.

-पी.के. जुनेद, फळ व्यापारी

--

Web Title: Rusla, the king of fruits, has to pay extra this year to taste sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.