करमाळ्यात एस. टी. वाहक, चालक प्रवाशांची नेत्रतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:57+5:302021-03-28T04:21:57+5:30
करमाळा : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना युवा सेनेच्या वतीने करमाळा येथील बसस्थानकावर एस. टी. वाहक, चालकांसाठी ...
करमाळा : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना युवा सेनेच्या वतीने करमाळा येथील बसस्थानकावर एस. टी. वाहक, चालकांसाठी आणि प्रवाशांसाठी घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटपाचे उद्घाटन शिवसेनेचे दिग्विजय बागल यांच्या हस्ते झाले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा आगाराच्या प्रमुख अश्विनी किरगत उपस्थित होत्या. यावेळी बागल म्हणाले, भविष्यात शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नावर भरीव काम करणार आहोत.
या वेळी नेत्ररोग तज्ज्ञ दिलीप अहिरे, डाॅ. प्रियंका अहिरे, डॉ. भुषण गवई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी भविष्यातल्या उपक्रमावर भाष्य केले. कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे, माजी शहर प्रमुख संजय शिलवंत, तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे, शहर अध्यक्ष विशाल गायकवाड उपस्थित होते.
कुटीर रुग्णालय येथे ४३६ व करमाळा बसस्थानकावर २७८ असे एकूण ७१४ जणांची नेत्र तपासणी करुण मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
--
२७ करमाळा
नेत्रतपासणी शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना दिग्विजय बागल, आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत, महेश चिवटे, भरत आवताडे