सांगोला बसस्थानकावर एस. टी. चे ‘नाथजल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:46 AM2020-12-17T04:46:28+5:302020-12-17T04:46:28+5:30

दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बाटलीबंद पाणी व्रिक्रीची योजना नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात कार्यान्वित झाली आहे. महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाची मोठी परंपरा लाभली ...

S. at Sangola bus stand. T. 'Nathjal' | सांगोला बसस्थानकावर एस. टी. चे ‘नाथजल’

सांगोला बसस्थानकावर एस. टी. चे ‘नाथजल’

Next

दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बाटलीबंद पाणी व्रिक्रीची योजना नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात कार्यान्वित झाली आहे. महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे त्या वारकरी सांप्रदायामध्ये आपल्या गुरूला नाथ या नावाने संबोधले जाते. त्यांच्या आदराप्रीत्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास ‘नाथजल’ हे नाव दिले आहे. प्रवाशांना एक लिटर बाटलीबंद पाणी १५ रुपयात मिळणार आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर या विभागातील बसस्थानकावर ही सोय सुरू केली आहे.

एसटी आगारातील उपहारगृहचालक, दुकानदार , विक्रेत्यांनी फक्त नाथजल बाटलीबंद पाण्याची विक्री करावी, असा आदेश परवानाधारकांना दिला आहे. इतर कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास मनाई केली आहे, तशा सूचना दिल्या आहेत. एसटीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास व चढ्या दराने विक्री केल्यास आगारातील उपहारगृहचालक, दुकानदारांचा परवाना रद्द करण्याचा इशारा महामंडळाने एसटीला दिला आहे.

----

सांगोला आगारातील परवानाधारक उपहारगृहचालक, स्टाॅल्स, दुकानदार यांच्याकडून इतर कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री बंद करून आता ‘नाथजल’ बाटलीबंद पाण्याची विक्री करावी, अन्यथा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

- पांडुरंग शिकारे, आगारप्रमुख सांगोला.

----

Web Title: S. at Sangola bus stand. T. 'Nathjal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.