सचिन कल्याणशेट्टी यांची लसीकरण केंद्राला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:33+5:302021-04-14T04:20:33+5:30
वैद्यकीय यंत्रणेला सूचना देताना कल्याणशेट्टी यांनी रोज तपासणी व लसीकरणावर भर द्यावी. काही अडचणी असल्यास सांगाव्यात. तालुक्यातील विविध ...
वैद्यकीय यंत्रणेला सूचना देताना कल्याणशेट्टी यांनी रोज तपासणी व लसीकरणावर भर द्यावी. काही अडचणी असल्यास सांगाव्यात. तालुक्यातील विविध मोठमोठ्या गावात लसीकरण शिबिरे घेऊन जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक महेश हिंडोळे, नागराज कुंभार, कांतू धनशेट्टी, डॉ. अशोक राठोड, विस्तार अधिकारी महेश भोरे, सुरेश भास्कर, शंकर कुंभार, राजशेखर लोकापुरे, रमेश कापसे आदीजण उपस्थित होते.
बारा हजार लोकांना लस
तालुक्यात अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय, चप्पळगाव, शिरवळ, वागदरी, मैंदर्गी, दुधनी, नागणसुर, जेऊर, करजगी या आठ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या संलग्न असलेल्या १५ उपकेंद्र असे तब्बल २४ ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण राेज सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात बारा हजार लोकांनी लस घेतल्याचे डॉ. आश्विन करजखेडे यांनी सांगितले.
१३अक्कलकोट-लसीकरण
अक्कलकोट येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी कोरोना संवाद साधताना आमदार सचिन कल्याणशेट्टी.