सचिनने विसाव्या वर्षी अपघातात डोळे गमावले; जिद्द न हरता ‘अॅक्युप्रेशर’ मध्ये मिळविले प्रावीण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:53 AM2019-10-15T11:53:29+5:302019-10-15T11:54:59+5:30
जागतिक पांढरी काठी दिन विशेष... अंधांसाठीच्या शासकीय योजनेतून केला कोर्स
रुपेश हेळवे
सोलापूर : जेमतेम २० वर्षांचा सचिऩ शिक्षणात त्याला आवड नव्हती; पण गाडी दुरूस्तीमध्ये जास्त रस होता़ यामुळे शिक्षण सोडून गाड्या दुरूस्ती करणे शिकला, याचा व्यवसाय सुरू केला़ व्यवसायही जोमाने सुरू होता पण या काळातच एक अपघात झाला याची जाणीव आता शेवटच्या श्वासापर्यंत असणार आहे़ कारण या अपघातामध्ये त्याने आपले दोन्ही डोळे गमावले़ डोळे असताना अख्खं जग पाहणाºया सचिनला आता दिसत नाही़ ऐन तरूण अवस्थेमध्ये आपले डोळे त्याने गमावले़ यावर आजही त्याचा विश्वास बसत नाही़ पण डोळे गेलेतरी त्याने आपल्या जगण्याची जिद्द सोडली नाही़ आता तो अॅक्युप्रेशर मसाज करून आपली उपजीविका करत आहे.
सचिन हा मूळ तळेवाडी, तालुका बार्शी येथील तरुण़ मार्च २००७ मध्ये त्याचा अपघात झाला. या अपघातात समोरच्या गाडीची हेडलाईटची काच त्याच्या डोळ्यात घुसली़ यामध्ये त्याचा एक डोळा निकामी झाला आणि दुसरा डोळा अंतर्गत रक्तस्त्रावामुळे निकामी झाला़ काही क्षणातच त्याचे होत्याचे नव्हते झाले़ त्याचे रंगीत जीवन चित्रहीन झाले. यामुळे अनेक ठिकाणी त्याने डोळ्याचे इलाज केले़ पण काहीही उपयोग झाला नाही़ तरीही तो डगमगला नाही़ लातूरमध्ये जाऊन अॅक्युप्रेशरचे ट्रेनिंग घेतले. आज तो आपली उपजीविका या अॅक्युप्रेशर मसाजच्या माध्यमातून करत आहे़ तो मूळ सोलापूरचा पण अपघातानंतर थोडे दिवस सोलापुरात सेवा केली आता तो पुणे येथे जाऊन पुढील शिक्षण घेत आपली सेवा बजावत आहे़ यामुळे तरुणवयात डोळे गमावणारा सचिन आता डोळ्याचे दान करावे याबाबत जनजागृती करत आहे.
सोलापुरात २०११ च्या जनगणनेनुसार ५८० अंध आहेत़ अंधासाठी शासनाच्या वतीने विविध योजना आहेत या योजनांमुळे अंध लोकांना चांगला फायदा होत आहे़ या योजनेमधूनच सचिनने अॅक्युप्रेशरचा कोर्स केला आहे, अशी माहिती नॅबचे एनएबी निवासी अंध कार्यशाळेचे रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
पांढºया काठी दिनाचा इतिहास ...
- सन १९२१ मध्ये जेम्स बिग हे व्यावसायिक छायाचित्रकार अमेरिकेत कार्यरत होते. दुर्दैवाने एका अपघातात त्यांना आपले डोळे गमवावे लागले. त्यात त्यांना कायमचे अंधत्व आले, पण अंधत्वाला न घाबरता सगळीकडे विहार करण्यासाठी पहिल्यांदा पांढºया काठीचा वापर करण्यात आला. सुरुवातीला ही काठी पूर्ण पांढºया रंगाची होती. ती लाकडी व साध्या पद्धतीची होती. फक्त तिला पांढरा रंग देण्यात आला होता. १९६४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंकन बी. जॉन्सन यांनी १५ आॅक्टोबर हा 'पांढरी काठी दिन' म्हणून साजरा करण्यात येईल, असे घोषित केले. तसेच 'युनो'नेसुद्धा जागतिक पांढरी काठी दिन १५ आॅक्टोबरलाच साजरा केला जाईल, असे जाहीर केले. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.
मी वीस वर्षांचा असताना माझे दोन्ही डोळे गमावले़ या अपघातातून मी सावरलो़ जे सत्य जीवन आहे ते मी स्वीकारले़ आज अॅक्युप्रेशरच्या माध्यमातून मी उपजीविका करत आहे़ पण डोळ्यांची काय किंमत असते मी जाणतो़ यामुळे लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे आपल्या डोळ्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये रंग भरू शकतो़ आज आपल्या देशाची लोकसंख्या १३५ कोटी पेक्षा जास्त असूनही आज आपल्याला बाहेरच्या देशातून डोळ्यांची आयात करावी लागते़ यासाठी लोकांनी नेत्रदानासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा.
-सचिन पवार