दु:ख बातमी; सोलापुरातील ज्येष्ठ कलावंत शुकुर सय्यद यांचे निधन
By Appasaheb.patil | Published: February 9, 2023 09:12 PM2023-02-09T21:12:15+5:302023-02-09T21:12:23+5:30
त्यांचे मरण रंग हे नाटक हे राज्य नाट्य स्पर्धेत पहिले आले होते.
सोलापूर : ज्येष्ठ कलावंत शुकुर सय्यद (८२, रा. निर्मिती विहार, विजापूर रोड, सोलापूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन मुलं, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
सोलापुरातील ते सर्वांत ज्येष्ठ कलावंत आहेत. त्यांचे मरण रंग हे नाटक हे राज्य नाट्य स्पर्धेत पहिले आले होते. डोंगर म्हातारा झाला हेही नाटकातही त्यांनी प्रमुख भूमिका बजाविली होती. ते महापालिकेतील बांधकाम विभागात बरीच वर्षे सेवेत होते. त्यांना दोन मुले आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. एक विवाहित मुलगी आहे. त्यांना तीन भाऊ आहेत. सध्याच्या अलीकडे नाट्य परिषद उपनगरी शाखेच्यावतीने त्यांना २०१८ ला डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली कलावंत गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. हुतात्मा स्मृती मंदिराच्या स्थापनेनंतर ते सहव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले. ते स्मृती मंदिरात काम करीत होते त्यामुळे त्यांचे सर्व कलावंत आवडीचे होते.
प्रकाश यलगुलवार यांच्या संस्थेत त्यांनी काम पाहिले, त्याचे आकाश बक्षी हेही नाटक पहिले आले होते. त्यांना अनेक रौप्य पदके मिळालेली आहेत. कामगार कल्याण मंडळाच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका पार पाडली, अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. नाट्य परिषद उपनगरीच शाखेच्यावतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्याचा लवकरच कार्यक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्ष दादा साळुंखे यांनी लोकमत शी बोलताना दिली.