दूध आंदोलनावरून सदाभाऊ- राजू शेट्टी आमनेसामने; नगरमध्येही राम शिंदे-लोखंडे यांच्यात जुगलबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 05:39 AM2020-08-02T05:39:48+5:302020-08-02T05:40:11+5:30
माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.
पंढरपूर/कोल्हापूर : दूध दरवाढीच्या आंदोलनावरून एकेकाळचे शेतकरी चळवळीतील शिलेदार माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा आमनेसामने आले आहेत. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झालेले आहेत. ते भ्रमिष्ट झाले आहेत. अशी माणसं प्रत्येक गावात तोंड घालतात, त्यांना गांभीर्याने घ्यायचे नसते, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दूधदरवाढीच्या आंदोलनावेळी केली. खोत म्हणाले, तुम्ही सरकारमध्ये आहात. शेतकऱ्यांना का न्याय मिळत नाही ? आंदोलन करायचे नाटक करू नका. सदाभाऊंनी तुमच्यासारख्या शेकडो एकर जमिनी घेऊन ठेवल्या नाहीत. शेट्टी यांना सगळीकडे सदाभाऊच दिसताहेत.
त्यावर शेट्टी म्हणाले, माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.
‘आमच्या नेत्यांमध्ये चार बायका सांभाळण्याची ताकद’
अहमदनगर : एका नवºयाच्या दोन बायका असे हे तिघाडी सरकार
आहे. त्यांना शेतकºयांचे काहीही
घेणे-देणे नाही, अशी टीका माजी
मंत्री राम शिंदे यांनी येथे
दूध आंदोलनावेळी केली. त्यावर
ज्या नवºयामध्ये दोन बायका सांभाळण्याची ताकद असते, तो
दोनच काय चार बायकाही
सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.
भाजपला आंदोलन करण्याचा अधिकारच नाही - थोरात
मुंबई : पाच वर्ष भाजपचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी दुधाच्या प्रश्नावर शेतकºयांना न्याय दिला नाही, आणि आता तेच आंदोलन करत आहेत, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
केंद्र सरकारने दहा लाख मेट्रिक टन दूध पावडर न्यूझीलंडहून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रद्द करण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावावी. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन दुसºयाचे पहायचे वाकून, या वृत्तीने भाजपचे नेते महाराष्ट्रात शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही थोरात यांनी आहे.
नाचता येईना अंगण वाकडे
वडगाव मावळ (पुणे) : मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतातील काही कळत नाही. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसे लक्ष शेतकºयांच्या प्रश्नांवर घाला. नाचता येईना, अंगण वाकडे, अशी सरकारची स्थिती असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.