बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मस्जिदमध्ये साेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:01+5:302021-05-03T04:17:01+5:30

बार्शी : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच येथे इतर तालुक्‍यातून येत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत होती. त्यासाठी ...

Sae in the mosque for the relatives of the affected patients | बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मस्जिदमध्ये साेय

बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मस्जिदमध्ये साेय

Next

बार्शी : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच येथे इतर तालुक्‍यातून येत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत होती. त्यासाठी ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद समोर ठेवून जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन बागवान मक्का मस्जिदच्या विश्वस्तांनी मस्जिदमध्येच १०० बेड व किचन तयार केले आणि जेवणासह रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याची सोय केली आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात माणुसकी हाच धर्म असल्याचे बार्शीतील या मस्जिदच्या ट्रस्टींनी दाखवून दिले आहे. शहरात मध्यवस्तीमध्ये पांडे चौकात असलेल्या बागवान मक्का मस्जिद विश्वस्त, बार्शी शहर शिवसेना, राजमाता इंदूताई आंधळकर अन्न छात्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, गृहनिर्माणचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या उपस्थितीत १ मे रोजी हा उपक्रम सुरू केला आहे.

मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या बागवान मक्का मस्जिदमध्ये १०० बेड, जेवण तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्यासह गॅसची व्यवस्था, फळे, भाजीपाला अशी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी स्वच्छतागृहाचीही सोय केली आहे.

मक्का मस्जिदचे विश्वस्त शौकत महंमद हनिफ येडशीकर, दिलावर बागवान, रतन बागवान, हाजी लियाकत बागवान यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी अशा संकटकाळी मदत करणे हीच मानवता आहे, असे सांगून शंभर बेडसह जेवण तयार करण्यास होकार दिला.

मस्जिदमध्ये दोन मोठे हॉल असून, एक हॉल पुरुषांसाठी तर दुसरा हॉल महिलांसाठी करण्यात आला आहे. येथे स्वतःला पाहिजे ते जेवण तयार करायचे असून, तेथे सर्व व्यवस्था ठेवली आहे.

Web Title: Sae in the mosque for the relatives of the affected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.