‘भगवा’ राज्य व्यापणार

By admin | Published: July 21, 2014 01:21 AM2014-07-21T01:21:50+5:302014-07-21T01:21:50+5:30

उद्धव ठाकरे यांचा विश्वास : सेनेच्या उमेदवाराला निवडून द्या

The 'saffron' state will occupy the state | ‘भगवा’ राज्य व्यापणार

‘भगवा’ राज्य व्यापणार

Next


बार्शी: राज्यातील सत्ताधारी सरकार सूडबुद्धीने कारभार करीत असून, येणाऱ्या निवडणुकीत भगवंताच्या आशीर्वादाने बार्शीमधून फडकणारा भगवा राज्य व्यापेल व महाराष्ट्र भगवामय होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बार्शी येथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला़
येथील भगवंत मैदानावर ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुरकर, खा. रवींद्र गायकवाड, आ. ओमराजे निंबाळकर, सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, तानाजीराव सावंत, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, दिनकर माने, उत्तमप्रकाश खंदारे, शिवशरण पाटील, रविकांत पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,अरूण बारबोले, रावसाहेब मनगिरे,भाऊसाहेब आंधळकर, संतोष निंबाळकर, दीपक आंधळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मला माझ्या जुन्या सभेची आठवण होते. २००४ साली याच मैदानावर सभा घेतली होती. तोच उत्साह, तिच गर्दी, तशीच रोषणाई, तशीच आतषबाजी आजही पहावयास मिळते आहे. २००४ ला झालेल्या विजयाची या निवडणुकीतही पुनरावृत्ती होईल. नव्हे तर भगवंत बार्शीबरोबरच राज्यात सत्ता येण्यासाठी आशीर्वाद देईल़ भगवंताचा भगवा झेंडा खाली उतरला नाही पाहिजे, बार्शीचा आमदार सेनेचा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.सेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विरोधकांना उमेदवार शोधावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लागावला.
स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या काँग्रेसवाल्यांचा एकही आमदार निवडून येता कामा नये. असा आवाहन त्यांनी केले़ यावेळी रामदास कदम, खा. रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब आंधळकर, सभापती कौशल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, अस्मिता गायकवाड, श्रीधर कांबळे, किशोर मांजरे, राजा काकडे, प्रा. अशोक सावळे, दीपक आंधळकर यांचीही भाषणे झाली़
-------------------------
अजित पवारांना प्रतिआव्हान
संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या सभांना होत असलेली गर्दी ही सेनेवर प्रेम करणाऱ्या सैनिकांची आहे. अशी गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमवून दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.
कृषिमंत्री शरद पवारांना सत्तेत असताना पंतप्रधानांना भेटावेसे वाटले नाही. मात्र आमची सत्ता आल्यावर पंतप्रधानांना भेटावयास जाता. मग सत्तेत होता त्यावेळी काय करीत होता, त्यांना धरणांपेक्षा लावासासारखी शहरे उभी करावेसे वाटते, असा टोला ठाकरे यांनी हाणला़
 

Web Title: The 'saffron' state will occupy the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.