रशियाच्या एकतेरिना हिला हरवत भारताच्या सहजा यमलापल्लीने पटकवले विजेतेपद
By रूपेश हेळवे | Updated: December 24, 2023 18:07 IST2023-12-24T18:06:53+5:302023-12-24T18:07:09+5:30
भारताच्या सहजा यमलापल्ली हिने रशियाच्या एकतेरिना हिला हरवत विजेतेपद संपादन केले.

रशियाच्या एकतेरिना हिला हरवत भारताच्या सहजा यमलापल्लीने पटकवले विजेतेपद
सोलापूर : जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए २५ हजार डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने रशियाच्या एकतेरिना हिला हरवत विजेतेपद संपादन केले.
सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत भारताच्या सातव्या मानांकित सहजा यमलापल्ली हिने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा ६-४, ६-३ असा पराभव केला. हा सामना १ तास २४ मिनिटे चालला. स्पर्धेतील विजेत्या सहजा यमलापल्लीला प्रिसिजन करंडक व ३ लाख २९ हजार ६०५ रुपये, तर उपविजेत्या एकतेरिना मकारोवा हिला करंडक व १ लाख २९ हजार ८८१ रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रिसीजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे यतीन शहा, डॉ. शंतनू गांधी व सिद्धार्थ गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.