सहकार महर्षीप्रमाणेच शंकर कारखाना दर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:27+5:302021-09-27T04:24:27+5:30

वाघोली (ता.माळशिरस) येथे श्री शंकर साखर कारखान्याची ऊस परिसंवाद परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. चेअरमन आमदार ...

Like Sahakar Maharshi, Shankar will pay factory rates | सहकार महर्षीप्रमाणेच शंकर कारखाना दर देणार

सहकार महर्षीप्रमाणेच शंकर कारखाना दर देणार

googlenewsNext

वाघोली (ता.माळशिरस) येथे श्री शंकर साखर कारखान्याची ऊस परिसंवाद परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, कारखाना बऱ्याच अडचणींवर मात करून चालू करण्यात येत आहे. पूर्वीच्या ऊस उत्पादक सभासदांची देणी कारखाना लवकरच देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारची देणी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणावरही टीका न करता कारखाना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कामकाज सुरू असल्याचे व्हाइस चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी उपसभापती प्रताप पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी व्हाइस चेअरमन बाबाराजे देशमुख, माजी पं.स. सदस्य सूर्यकांत शेंडगे, संचालक दत्तात्रय चव्हाण, भगवान मिसाळ, धनंजय चव्हाण, सतीश शेंडगे, उत्तमराव माने, माजी सभापती रावसाहेब पराडे, पंडित पराडे, विष्णू मिसाळ, चंद्रसेन मिसाळ, मुद्रा उद्योग समूहाचे सचिन मिसाळ, उत्तम भोसले, कालिदास मिसाळ, मारुती मिसाळ, दत्तात्रय हेंबाडे, विनायक पराडे, डॉ. अमोल माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी केले, तर आभार सुभाष चव्हाण यांनी मानले.

Web Title: Like Sahakar Maharshi, Shankar will pay factory rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.