सही मस्टरवरी अन् साहेब मात्र घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:45+5:302021-06-16T04:30:45+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार ७ जूनपासून ग्रामीण भाग हा काही नियम करत अनलॉक केला. त्यात सर्व शासकीय कार्यालयेदेखील ५० टक्क्यांच्या ...
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार ७ जूनपासून ग्रामीण भाग हा काही नियम करत अनलॉक केला. त्यात सर्व शासकीय कार्यालयेदेखील ५० टक्क्यांच्या आस्थापनेने सुरू राहतील, असे म्हटले होते. मात्र, येथील पंचायत समितीत ही परिस्थिती अद्यापही दिसून आली नाही. येथील कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, बालविकास अश्या अनेक विभागांत त्यांच्या विभागप्रमुखासह कर्मचारीही गैरहजर राहत आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून रिकाम्या हाताने त्यांना माघारी आपल्या गावी अशा परिस्थितीत जावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन संबंधित कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती कशी राहील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
-----
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले की ते सर्व शासकीय यंत्रणेत फायनल समजले जातात आमच्या लेखी आदेशाची कोणी वाट पाहू नये ५० नव्हे तर १०० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आपापल्या कार्यालयात सर्वांनी लावाव्यात, अशा सूचना मी सर्व बीडीओंना दिलेल्या आहेत.
- परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) जिल्हा परिषद सोलापूर.
----
५० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात उपस्थिती लावावी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे लागेल तेच कर्मचारी व अधिकारी आपण कार्यालयात बोलावत आहोत.
- डॉ. संताजी पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कुर्डूवाडी.
---
फोटो १५ कुर्डूवाडी
कुर्डूवाडी पंचायत समितीच्या अनेक विभागांतील सद्य:स्थितीत कार्यालय तर उघडे दिसते मात्र अधिकारी व कर्मचारी दिसत नाहीत.