सहकार महर्षीच्या संचालकाला ३२ लाखांचा गंडा,अकलूज येथे गुन्हा दाखल
By admin | Published: July 16, 2017 01:17 PM2017-07-16T13:17:06+5:302017-07-16T13:17:16+5:30
विश्वास संपादन करुन अशिक्षितता पणाचा गैरफायदा घेत पॉलिसी खाते व बँक आँफ बडोदा अकलूज शाखेतून चेक व मोबाईल बँकींगद्वारे परस्पर पैसे काढून
Next
>ऑनलाइन लोकमत
अकलूज, दि. 15 - विश्वास संपादन करुन अशिक्षितता पणाचा गैरफायदा घेत पॉलिसी खाते व बँक आँफ बडोदा अकलूज शाखेतून चेक व मोबाईल बँकींगद्वारे परस्पर पैसे काढून अब्बास बोहरी (अकलूज) याने ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद सहकार महर्षी कारखान्याचे संचालक नामदेव ठवरे यांनी अकलूज पोलिसात दिली आहे़ अकलूज पोलिसांनी अब्बास बोहरी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार खुडूस (ता. माळशिरस) येथील रहिवासी व सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक नामदेव विठोबा ठवरे व त्यांची पत्नी शांताबाई नामदेव ठवरे यांचे बँक आँफ बडोदा अकलूज शाखेत बचत खाते आहे. नामदेव ठवरे दैनंदिन आर्थिक व्यवहारसाठी बँकेत नेहमी जातात.
दरम्यान इंडिया फास्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचे एंजन्ट अब्बास शबीर बोहरी (रा. अकलूज) यांची ओळख झाली. नामदेव ठवरे यांचे शिक्षण कमी असल्याने व पत्नी अशिक्षित असल्याने बँकेची स्लिप भरुन घेणे व इतर कामासाठी बोहरी यांची मदत घेत होते. बोहरी यांनी बँक व्यवहाराच्या व इतर कामात मदत करीत त्यांचा विश्वास संपादन करुन ठवरे यांना इंडिया फास्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी काढण्यास भाग पाडले. बँक व्यवहार व इतर वैयक्तिक कामात मदत करत असल्याने व पॉलिसी खात्यामुळे ठवरे पती पत्नीचे बँक खाते तसेच इतर माहिती बोहरी यांनी अवगत झाली होती. त्याचा फायदा घेत ठवरे यांच्या बँक खात्यातून स्लिपवर बनावट सह्या करुन अब्बार बोहरीने मोबाईल बँकींगद्वारे पॉलिसीचे हप्ते कंपनीकडे न भरता ३२ लाख २ हजार ३७६ रुपये स्वत: हडप केले़ हा प्रकार नामदेव ठवरे यांच्या लक्षात येताच त्यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ यावरुन अब्बास बोहरी विरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि राजेश राठोड हे करीत आहेत.यातील आरोपी बोहरी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.