शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे पगार निश्चित करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:16 AM2021-06-05T04:16:43+5:302021-06-05T04:16:43+5:30

महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात एमबीबीएस एमडी, डीएनबी, एमबीबीएस एमडी/ डिप्लोमा डॉक्टरांना वर्गवारीप्रमाणे देण्यात येणारा पगार कमी आहे. त्यांच्या तुलनेत कर्नाटक ...

The salaries of doctors in government hospitals should be fixed | शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे पगार निश्चित करावेत

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे पगार निश्चित करावेत

Next

महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात एमबीबीएस एमडी, डीएनबी, एमबीबीएस एमडी/ डिप्लोमा डॉक्टरांना वर्गवारीप्रमाणे देण्यात येणारा पगार कमी आहे. त्यांच्या तुलनेत कर्नाटक राज्यात एमबीबीएस एमडी/डीएनबी यांना प्रतिमहा ४ लाख, एमबीबीएस १ लाख रुपये असे पगार आहेत.

संबंधित रुग्णांना खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्चून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यातच ते कर्जबाजारी होऊन आत्महत्येसारखा निर्णय घेतात. कर्नाटक राज्याप्रमाणे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना पगार देण्याची कार्यवाही निश्चित केल्यास सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर उपचाराचा लाभ होणार आहे. ही रिक्त पदे भरल्यास कोरोनाच्या काळात मोठ्या समस्येवर तोडगा काढता येईल. यासाठी त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जाकीर शेख, बहुजन ब्रिगेडचे शहराध्यक्ष आनंद मिसाळ उपस्थित होते.

Web Title: The salaries of doctors in government hospitals should be fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.