शेटफळमधील केळीची परदेशात विक्री; सव्वादोन एकरात अकरा लाखांचे घेतले उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:03 PM2020-02-21T12:03:24+5:302020-02-21T12:06:54+5:30
वैभव पाटील या शेतकºयाची यशोगाथा; ड्रिपच्या माध्यमातून शेतीच्या उत्पादनात केली वाढ
नासीर कबीर
करमाळा : पारंपरिक पिकाला कंटाळून उसाऐवजी केळीचे पीक घेण्याचा संकल्प केला... त्यांच्यासोबतच्या शेतकºयांनी गटशेतीचा मार्ग निवडला... सव्वादोन एकरात आठ ट्रॉली कुजलेले शेणखत वापरून केळीची लागवड केली... ड्रिपद्वारे पाणीपुरवठा केला... केळीची लागवड केली... अकरा महिन्यांत अकरा लाखांचे उत्पन्न घेणारे तरुण मार्गदर्शक शेतकरी ठरले आहेत.
वैभव पोळ असे त्या तरुण शेतकºयाचे नाव असून, त्यांनी शेटफळ (ता़ करमाळा) येथे हे पीक घेतले आहे़ त्यांनी केळी पिकाचे जवळपास एकरी ४० टन उत्पादन मिळवले आहे़ सध्या चांगला दर मिळत आहे़ त्यांना सव्वादोन एकर क्षेत्रातून ११ महिन्यांत १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
या गावातील तरुण शेतकरी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग केला़ त्यांनी केळी पिकाची निवड केली. याच माध्यमातून वैभव पोळ या तरुणाचे गावात पी.व्ही़सी. पाईप ठिबक व शेती उपयोगी साहित्याचे दुकान आहे. स्वत:चा व्यवसाय सांभाळत ते गेल्या चार-पाच वर्षांपासून आपल्या शेतात आधुनिक तंत्राचा वापर करून अनेक प्रकारची पिके घेताहेत.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उसाचे पीक काढल्यानंतर गटशेतीच्या माध्यमातून २८ जानेवारी रोजी स्वत:च्या शेतात जैन टिश्यू कल्चरच्या केळीच्या रोपांची सात बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. तत्पूर्वी या क्षेत्रावर आठ ट्रेलर कुजलेले शेणखत टाकून मशागत केली. जैन कंपनीचे शेतीतज्ज्ञ किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोपांच्या दोन्ही बाजूला ठिबक लाईन टाकून पाणी व्यवस्थापन केले. पुण्यातील कृषी तज्ज्ञ अविनाश कुलदीपकर यांच्याकडून रासायनिक खतासंबंधी माहिती घेतली़ त्यांच्याबरोबर काळाची गरज ओळखून शेतकरी गटाच्या माध्यमातून पीकप्रयोग सुरू केले़ त्यांच्या केळीच्या घडाचे वजन ३०-३५ किलो भरले आहे़ त्यांचा हा प्रयोग परिसरातील इतर शेतकºयांना मार्गदर्शक ठरला आहे.
पाणी असलेल्या बहुतांश भागात जवळपास शेतक ºयांचा कल हा ऊसाकडे आहे़ मात्र केळीसारख्या पिकातूनही त्याहून अधिक उत्पन्न घेऊ शकतो याची खात्री या वेगळ्या प्रयोगातून झाली़ हाच प्रयोग इतर शेतकºयांनीही करावा़ यातून वेगळी दिशा मिळू शकेल़
- वैभव पाटील, केळी उत्पादक, शेटफळ (करमाळा)