अनगरमध्ये पर्यावरणपूरक शाडू-मातीच्या गणेशमूर्तींची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:23 AM2021-09-11T04:23:30+5:302021-09-11T04:23:30+5:30
ग्राहकांनीही खरेदी करून याला चांगला प्रतिसाद देणे गरजेचे असल्याची अपेक्षा कलाकारांनी व्यक्त केली. कोविड काळातही सर्व नियम पाळत कुंभारवाड्यात, ...
ग्राहकांनीही खरेदी करून याला चांगला प्रतिसाद देणे गरजेचे असल्याची अपेक्षा कलाकारांनी व्यक्त केली. कोविड काळातही सर्व नियम पाळत कुंभारवाड्यात, कोष्ट गल्ली, कॉलेज रोड येथे सर्व प्रकारांच्या आकर्षक गणेशमूर्तींची दुकाने थाटण्यात आली. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
मरोळाची माती, शाडूच्या मिश्रणापासून दोन महिन्यांत कष्ट घेत अवघ्या ५० गणेशमूर्ती तयार झाल्या. त्या आज विक्रीला काढल्या असता जाणकारांनी त्यांना चांगला दर देऊन विकत घेतल्या. पुढील वर्षापासून सर्व गणेशमूर्ती या शाडू-मातीच्या करणार असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला साथ देणार असल्याचे शिवम महादेव कुंभार यांनी सांगितले.
कोट
आज पारंपरिक गणेशोत्सवाबरोबरच पर्यावरणपूरक शाडू मातीच्या पाण्यात विरघळणाऱ्या गणेशमूर्ती खरेदी करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. अशा गणेशमूर्तींर्ची प्रतिष्ठापना केल्याचा आनंद आहे.
- डॉ. संतोष गुजरे, अनगर.
---- १०अनगर-गणेश
अनगर येथील शिवम महादेव कुंभार यांनी बनविलेल्या शाडू-मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती.
----
100921\img-20210910-wa0112.jpg
अनगरमध्ये पर्यावरण पूरक शाडू -मातीच्या गणेशमूर्तींची विक्री.