गुढी पाडव्यादिवशी ३१६ वाहनांची विक्री
By दिपक दुपारगुडे | Published: March 29, 2023 02:07 PM2023-03-29T14:07:40+5:302023-03-29T14:10:07+5:30
काही जणांनी आधीच दुचाकींनी बुकिंग करून ठेवली होती.
दीपक दुपारगुडे, सोलापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण सोने, घर, वाहन किंवा आपली आवडती वस्तू खरेदी करतात. पेट्रोल वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तरीही अनेक जण पेट्रोलचीच वाहने खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. या शुभ मुहूर्तावर २५८ दुचाकी, तर ५० चारचाकी आणि १२ हून अधिक इलेक्ट्रिक वाहने व १५० हून अधिक सायकलची खरेदी झाली आहे.
काही जणांनी आधीच दुचाकींनी बुकिंग करून ठेवली होती. त्यामुळे त्यांना वेळेत डिलिव्हरी मिळाली. तर ऐनवेळी दुचाकीच्या खरेदीसाठी गेलेल्या अनेकांना वाहन उपलब्ध झाले नाही. यंदा बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी- चारचाकी खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. पेट्रोल व डिझेलचा दर प्रतिलिटर शंभरीपार गेला. पेट्रोल- धावते. डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. चारचाकीऐवजी दुचाकी खरेदीला प्राधान्य देत आहेत.
२५८ दुचाकींची विक्री
शहरातील विविध शोरूममधून किमान २५८ पेक्षा अधिक दुचाकी ग्राहकांनी घरी नेल्या. वेगवेगळ्या मॉडेल पाहता, जास्त मायलेज असलेल्या गाडयांना जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
चारचाकीपेक्षा दुचाकी बाजार जोरात
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी अंगणात यावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांनी चारचाकींचे बुकिंग करून ठेवले होते. यात तीन- चार दिवसांपासून अधिक भर पडली. शहरातील वेगवेगळ्या शोरूममधून ५० पेक्षा जास्त चारचाकींची विक्री झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"