महाप्रितसोबत साेलापूर विद्यापीठाचा सौर उर्जा सामंजस्य करार
By संताजी शिंदे | Published: May 6, 2024 09:31 PM2024-05-06T21:31:53+5:302024-05-06T21:32:15+5:30
विद्यापीठ अपारंपारिक उर्जा उत्कृष्टता केंद्राचीदेखील उभारणी करणार आहे, असे मत यावेळी कुलगुरू महानवर यांनी व्यक्त केले.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने हरित उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने महाप्रितसोबत सामंजस्य करार स्वाक्षरी केल्या. करारा प्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, महाप्रितचे संचालक विजय काळम पाटील, संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य वित्त अधिकारी डी.सी. पाटील, मुख्य महाव्यवस्थापक सतीश चवरे, महाव्यवस्थापक विकास रोडे, महाव्यवस्थापक तेजस शिंदे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सौर उर्जा निर्मिती करुन विद्यापीठाला उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. विद्यापीठाची असणारी नापिक उपलब्ध जमीन याचा वापर विद्युत निर्मितीसाठी केला जाणार आहे. विद्यापीठ अपारंपारिक उर्जा उत्कृष्टता केंद्राचीदेखील उभारणी करणार आहे, असे मत यावेळी कुलगुरू महानवर यांनी व्यक्त केले.
महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांनी दृकश्राव्य (व्हिडीओ कॉन्फरन्सींग) बोलताना म्हणाले की, हा सामंजस्य करार महाप्रितच्या दृष्टीने एक अभिनव पाऊल आहे. महाप्रित वेळेच्या आत अभिनव तंत्रज्ञानाद्वारे हे काम पूर्ण करेल. महाप्रितकडे आजमितीस विविध तंत्रज्ञानाचे तज्ञ कार्यरत असून त्यांच्या अद्ययावत ज्ञानाआधारे सौर उर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण प्रकल्प राबविले जात आहेत. विद्यापीठाचा अपारंपारिक सौर उर्जा हा उपक्रम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नावलौकिक मिळवेल.
वातावरणीक बदल काम होईल : विजय काळम-पाटील
० यावेळी बोलताना महाप्रितचे संचालक विजय काळम पाटील की, महाप्रित व विद्यापीठ संयुक्त पध्दतीने सौर उर्जा, कौशल्य विकास क्षेत्र, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, जलसंवर्धन व वातावरणीय बदल काम करु शकेल. यादृष्टीने प्रत्यक्ष पहिले पाऊल उचलण्यासाठी महाप्रितच्या तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक विद्यापीठातील प्रस्तावित ठिकाणांची पाहणी करुन पुढील कामकाजास सुरुवात करेल. आवश्यकतेनुरुप इतर प्रकल्पांची सुरुवात करण्यात येईल.