साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र म्हणजे भाजप-शिंदे सरकारचा २०० काेटींचा जुमला, प्रशांत बाबर यांचा आराेप

By राकेश कदम | Published: November 28, 2023 05:38 PM2023-11-28T17:38:10+5:302023-11-28T17:38:34+5:30

बाबर म्हणाले, राज्य सरकारने २४ नाेव्हेंबर राेजी साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्यात आल्याचा आदेश काढला.

Saleapur's food excellence center is BJP-Shinde government's 200 crore jumla, Prashant Babar's allegation | साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र म्हणजे भाजप-शिंदे सरकारचा २०० काेटींचा जुमला, प्रशांत बाबर यांचा आराेप

साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र म्हणजे भाजप-शिंदे सरकारचा २०० काेटींचा जुमला, प्रशांत बाबर यांचा आराेप

साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र हा भाजप आणि शिंदे सरकारचा २०० काेटींचा जुमला आहे. अन्न उत्कृष्टता अभियानातील प्रशिक्षण केंद्र बारामतीला जाण्यास भाजपचे साेलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार जबाबदार आहेत, असा आराेप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत गेला.

बाबर म्हणाले, राज्य सरकारने २४ नाेव्हेंबर राेजी साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्यात आल्याचा आदेश काढला. या आदेशाबाबत आम्ही कृषी अधिकारी आणि बारामतीमधील एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ( एडिटी) या महाविद्यालयाकडून माहिती घेतली. यातून अनेक गाेष्टी उघड झाल्याचे बाबर म्हणाले. 

प्रकल्पाची किंमत २०० काेटी आहे का?

राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पाैष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्याच्या महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरू केले. त्यासाठी सरकारने २०० काेटी रुपयांची तरतूद केल्याचे शासनाने १७ एप्रिल २०२३ राेजी जाहीर केले. हा निधी संपूर्ण राज्यासाठी आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी केवळ साेलापूरसाठी आहे, अशा जाहिराती केल्या. यासाठी आपण शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाचे १७ एप्रिल २०२३ चे परिपत्रक बघू शकताे. या २०० काेटींचे विवरण पाच वेगवेगळ्या याेजनांव्दारे केले जाणार आहे.
१. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पाेषण अभियानातंर्गत सर्व जिल्ह्यात कामे करणे - ११० काेटी
२.आत्मा याेजनेतून सर्व जिल्ह्यात कामे करणे ५ काेटी
३.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पानुसार काम करणे ५ काेटी
४.प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया याेजनेतून व मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया याेजना राबविणे (साेलापूर, ठाणे, नंदूरबार) - ५० काेटी रुपये
५. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत साेलापूर व अन्य जिल्हे ३० काेटी
असा पध्दतीने खर्च हाेणार आहे. हा खर्च मार्च २०२४ पर्यंत करायचा आहे.

साेलापूरला नेमके किती पैसे मिळणार आहेत?

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तत प्रकल्पांतर्गत (SMART) शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पौष्टीक तृणधान्य प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल तृणधान्यांच्या मुल्यसाखळी विकासासाठी विशेष विस्तार कार्यक्रमाचे आयोजन, पायाभूत सुविधांची उभारणी, प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया उद्योग उभारणी, ब्रॅडींग, मार्केटींगच्या सूविधा उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR) हैदराबाद या संस्थेसोबत सामंजस्य करार करून सोलापूर येथे तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणा-या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांची क्षमता बांधणी करण्यासाठी "श्री अन्न (Millets) उत्कृष्टता केंद्र" स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी रूपये ३० कोटी निधी मंजूर झाला हाेता.या ३० काेटीं खर्चाचे नियाेजन लावा असे आदेश केंद्र सरकारने, राज्याच्या कृषी विभागाने, सरकारने भाजप नेत्यांना, आमदारांना, जिल्हा प्रशासनाला केली हाेती. परंतु, हे नियाेजन लावण्यात साेलापूरचे भाजप नेते अपयशी ठरले.

का वळवला निधी?

हा निधी मार्च २०२४ पर्यंत खर्च करणे आवश्यक आहे. या निधी खर्चाचे नियाेजन साेलापुरात न लागल्यामुळे बारामती येथील एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट - एडिटी या महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी लागणारी मशिनरी देण्यासाठी ३ काेटी ९१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भाजप नेत्यांनी साेलापूरला २०० काेटी रुपये मंजूर झाल्याचा कागांवा केला. आता आम्ही उघड भूमिका घेतली आहे. भाजपच्या नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्हयात ३ ते ४ काेटी रुपयांचे काम हाेउ शकलेले नाही, असा आराेपही प्रशांत बाबर यांनी केला.

Web Title: Saleapur's food excellence center is BJP-Shinde government's 200 crore jumla, Prashant Babar's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.