दररोज ४० हजारांच्या आंब्याची विक्री
By admin | Published: May 12, 2014 01:02 AM2014-05-12T01:02:45+5:302014-05-12T01:02:45+5:30
गोपाळ नागणे : आंबा पिकवला अन् मार्केटिंगची गुपितेही आत्मसात केली
सोलापूर: अनेक वर्षे बांधकाम आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत कोट्यवधी रुपये मिळवून देणारे व्यवसाय केले़़क़ुठेही मानसिक आणि आत्मिक समाधान लाभत नव्हते़़क़ुळ वहिवाट पद्धतीने मिळालेली १५० एकर जमीन परत करुन स्वत: २५ एकर शेती केली़़़आंब्याची रोपे लावली़़़याबरोबरच मार्केटिंगची गुपिते आत्मसात केली़़़आज दररोज ४० हजारांचे आंबे विकून कर्जाचा सामना करुन मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांपुढे ‘आदर्श शेती’चा पर्याय ठेवला आहे़ ही यशोगाथा आहे लांबोटीतील आदर्श फळ उत्पादक गोपाळ बापू नागणे यांची़ त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली शेती पाहायला बाहेरील राज्यातून लोक येऊन अभ्यासू लागले आहेत़ गोपाळ यांचे वडील एक श्रीमंत व्यक्तीची १५० एकर शेती कसून गुजराण करीत होते़ त्यांना गोपाळसह आठ मुले़ मोठ्या कुटुंबाचा संसार कसाबसा करीत मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले़ गोपाळ यांनी सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण घेतले आणि बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकले़ पहिली सात महिने गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्ट घेतले़ या कामात बर्यापैकी पैसे मिळू लागले आणि या व्यवसायाच्या मदतीने खडीक्रशरचा व्यवसाय साकारला़ दहा वर्षांत या व्यवसायात हवा तेवढा पैसा मिळाला पण आत्मिक आणि मानसिक समाधान लाभले नाही़ इकडे वडील बापू नागणे हे देखील थकले होते़; मात्र कुळवहिवाट पद्धतीने कसत आलेली जमीन ही त्यांना मिळाली होती़ मात्र मनात कसलाही लोभ न ठेवता शेतात दररोज घाम गाळणारे बापू यांनी ती १५० एकर जमीन मूळ मालकांना परत केली़ त्यानंतर गोपाळ यांनी लांबोटीत २५ एकर जमीन घेतली आणि ती चांगल्या पद्धतीने फुलवली़ तसेच शेतीकामात सिव्हिल इंजिनिअरचा वापर केला़
-------------------------
पंतप्रधानांनी चाखले आंबे़
सोलापुरातील एका खान कुटुंबातील मुलगी ही दिल्लीत नांदत असून या मुलीच्या हट्टापाई तिच्या वडिलांनी सोलापुरातून नागणे यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी आंबे घेऊन गेले़ त्याचवेळी तिच्या घरी एक कार्यक्रम होता़ या कार्यक्रमाला पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हजेरी लावली आणि सोलापूरचा आंबा त्यांनी खाल्ला़ त्यांना सेंद्रीय आंबा फार आवडला आणि खान यांना विनंती करुन सोलापूरहून आंब्याची पेटी मागवली़ नागणे अचंबित झाले आणि दहा किलो आंबे विमानाने पार्सल करुन पाठवून दिले़