संचारबंदी नावालाच किराणा दुकानदारांची दुप्पट दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:42+5:302021-05-16T04:20:42+5:30
श्रीपूर परिसरात हातभट्टी दारु राजरोसपणे सुरू आहे. दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींनी दारूचे दर वाढवले आहेत. गुटखा, माणिकचंद, आरएमडीचे दर ...
श्रीपूर परिसरात हातभट्टी दारु राजरोसपणे सुरू आहे. दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींनी दारूचे दर वाढवले आहेत. गुटखा, माणिकचंद, आरएमडीचे दर दुप्पट केले आहेत. बियरबारमध्ये सर्व प्रकारच्या दारूच्या बाटल्यांचे दरही भरमसाठ वाढवून अक्षरशः लूट सुरू आहे. काही ढाब्यांवर पाठीमागून पार्सल देण्याच्या नावाखाली आतच जेवण, दारू, गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे. भाजी मंडईत संचारबंदी असल्याने मंडई केवळ बंद ठेवली आहे. पण भाजीविक्रेते शेतकऱ्यांकडून भाजी घेऊन दाराेदार विक्री करत आहेत.
अवैध धंदे खुलेआम करण्याचे धाडस करण्याची हिंमत वाढली आहे. नागरिकांना लुबाडणारे काही दलाल व्यापारी संचारबंदी लागू असताना आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. काही जागरूक नागरिकांनी अशा व्यापाऱ्यांचे, अवैध धंदे करणाऱ्यांचे फोटो पाठवून त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. सदर वस्तुस्थिती सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्याकडे लेखी तक्रार पाठविली जाणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.