संभाजी आरमारने रोखला तासभर रास्ता; कारवाईअंती कार्यकर्त्यांना ताब्यातून सोडले
By काशिनाथ वाघमारे | Published: January 11, 2024 05:40 PM2024-01-11T17:40:21+5:302024-01-11T17:42:59+5:30
पोलिसांनी या आंदोलनकांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणून कारवाई केली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले.
काशिनाथ वाघमारे,सोलापूर : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेला अन्यायकारक हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी आरमारच्या वतीने गुरुवारी सकाळी सोलापुरात मार्केट यार्ड चौकात असंख्य वाहन चालकांसमवेत रास्ता रोको आंदोलन करुन लक्ष वेधले. यावेळी जेलरोड पोलिसांनी या आंदोलनकांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणून कारवाई केली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले.
संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्रशासनाच्या नव्या मोटार कायद्याचा निषेध नाेंदवत 'जय शिवाजी, जय भवानी'च्या घोषणा दिल्या.
यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहरप्रमुख सागर ढगे, शहरउप्रमुख राज जगताप, विभागप्रमुख व्दारकेश बबलादीकर, स्वप्निल ईराबत्ती, गुरूनाथ औंरग, संभाजी आरमार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील, फैय्याज नगरवाले, शकील शेख, हजरत शेख, सिद्धाराम संगोळगी, संतोष खानापुरे, भास्कर भोसले, बंदेनवाज पठाण उपस्थित होते.
वाहन चालक कल्याणकारी मंडळ स्थापा:
यावेळी बोलताना संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी वाहन चालक वर लादलेला जुलमी कायद्या विरोधात संभाजी आरमार ने पुढाकार घेतल्याचे सांगितले. वाहन चालक कल्याणकारी मंडळ सरकारने स्थापन करण्याची आणि वाहन चालक बांधवांच्या लेकरांच्या शिक्षण आरोग्य सुविधा देण्याची मागणी केली. अपघातात जमावा कडून ड्रायवरचा मृत्यू झाल्यास त्याला एक कोटीची मदत त्याच्या कंटुबाला द्यावी अशी मागणी करत हा कायदा रद्द न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढू म्हणाले.