सोलापूरचं पाणी चोरणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमारची निर्दशने
By Appasaheb.patil | Published: March 27, 2023 02:30 PM2023-03-27T14:30:32+5:302023-03-27T14:31:21+5:30
कर्नाटक सरकार साेलापूर जिल्ह्यातील औज बंधाऱ्यातून पाणी चोरते.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर :कर्नाटक सरकार साेलापूर जिल्ह्यातील औज बंधाऱ्यातून पाणी चोरते. त्यामुळे सोलापूरकरांवर पाणीटंचाईची वेळ येत आहे. सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्यावर दरोडा टाकणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमार संघटनेने सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर आंदोलन करून निर्दशने केली.
यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध करून पाणी चोरी नाही थांबविल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, श्रीकांत डांगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात येते. हे पाणी औज बंधाऱ्याच्या माध्यमातून शहरात येते. मात्र हे पाणी वर्षानुवर्ष कर्नाटक सरकार चोरी करीत असताना लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी गप्प का असा सवाल उपस्थित केला.
गेल्या काही वर्षापासून उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम थांबले असतानाही कोणीच बोलायला तयार नाही, यावर कोणताच निर्णय होत नसल्याचीही खंत श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केली. पाणी चोरी करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या विरोधात कायदेशीर कारवाई नाही केल्यास संभाजी आरमार पुढील काळात मोठा मोर्चा सोलापुरात काढणार असल्याचेही यावेळी डांगे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"