सोलापुरात पुस्तकांचे पूजन करून संभाजी ब्रिगेडने उभारली परिवर्तनवादी शिवगुढी
By दिपक दुपारगुडे | Published: March 22, 2023 01:46 PM2023-03-22T13:46:51+5:302023-03-22T13:47:00+5:30
संभाजी ब्रिगेड च्या वतीने जुळे सोलापूर येथे भगवा ध्वजारोहण करून व महामानवांच्या विचारांच्या पुस्तकांचे पूजन करून परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली.
सोलापूर : संभाजी ब्रिगेड च्या वतीने जुळे सोलापूर येथे भगवा ध्वजारोहण करून व महामानवांच्या विचारांच्या पुस्तकांचे पूजन करून परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष श्याम कदम म्हणाले, वारकरी संप्रदाय ची गुढी भगव्या रंगाची आहे. बुद्धाने भगव्या रंगाचे चिवर निवडले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ध्वज भगव्या रंगाचा आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची अस्मिता आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची परंपरा आहे. त्यामुळे आपण घरावर भगवी पताका लाऊन छत्रपती संभाजी राजांना अभिवादन करून भगव्या रंगाच्या ध्वजाचीच गुढी उभारावी, हाच खरा गुढीपाडवा आहे असे आवाहन केले.
यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहरप्रमुख सिताराम बाबर, रमेश चव्हाण, राजेंद्र माने, गोविंद चव्हाण, गजानन शिंदे, ओंकार कदम, आकाश कदम, दत्ता पवार, उमेश जाधव आदी उपस्थित होते.