संभाजी महाराजांची बदनामी, सोलापूरसह पंढरपूरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 02:53 PM2018-10-12T14:53:19+5:302018-10-12T14:55:19+5:30

Sambhaji Maharaj's slander, Solapur and Pandharpura movement | संभाजी महाराजांची बदनामी, सोलापूरसह पंढरपूरात आंदोलन

संभाजी महाराजांची बदनामी, सोलापूरसह पंढरपूरात आंदोलन

Next
ठळक मुद्देशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीपंढरपूरात शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेची तोडफोड शालेय पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणारं लिखाण

सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करणाºया पुस्तकाची सोलापूर येथील जुना पुना नाका परिसरात असलेल्या संभाजी महाराज चौकात होळी करण्यात आली. याचवेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़.
शालेय पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणारं लिखाण प्रसिध्द झाले आहे. हे पुस्तक सोशल मिडियावर व्हायरल होताच संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन आंदोलन हाती घेतले. किरण घाडगे, बाळासाहेब बागल, दादा कदम, अमोल आटकळे, धनराज मोरे, नितीन शेळके, अनिल यादव, आकाश मांडवे, अनिकेत मेटकरी, शेखर आकळे, प्रशांत सुरवसे, स्वप्नील गायकवाड, पप्पु देशमुख, राहुल देवकर, दत्तराज साळुंखे, अनिकेत कदम, सोमा गांडुळे, दिलीप बाबर आदींच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली.

Web Title: Sambhaji Maharaj's slander, Solapur and Pandharpura movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.