मोहोळ तालुक्यात चार आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:25+5:302021-07-16T04:16:25+5:30
याबाबत डोंगरे म्हणाले, राज्यातील २७ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १९४ उपकेंद्राचे बांधकाम, आरोग्य उपकरणे, यंत्रसामग्री व मनुष्यबळ यासाठी आशिया ...
याबाबत डोंगरे म्हणाले, राज्यातील २७ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १९४ उपकेंद्राचे बांधकाम, आरोग्य उपकरणे, यंत्रसामग्री व मनुष्यबळ यासाठी आशिया विकास बँकेने ७४६७ कोटी निधी पैकी ७० टक्के म्हणजे ५१७७ कोटी, तर राज्य सरकारच्या हिश्श्याचे ३० टक्के म्हणजे २२९० कोटी रुपये इतका निधी या सर्व कामांसाठी मंजूर केला आहे. मोहोळ तालुक्यातील वरील चार आरोग्य उपकेंद्रासाठी मंजूर असलेला निधी प्राप्त करण्यासाठी उपकेंद्र बांधकाम आराखडे व अंदाजपत्रक शासनाकडे सादर करावे लागणार आहेत.
या आराखड्यात मुख्य इमारत, अधिकारी व कर्मचारी निवासस्थान, फर्निचर, अंतर्गत रस्ते, वीज, पाणी जोडणी आणि कंपाउंड यांचा समावेश करण्यात यावा असे सांगण्यात आले. त्यादृष्टीने संबंधित ग्रामपंचायत, बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे सभापती विजयराज डोंगरे यांनी सांगितले.
---