भटुंबरे येथे वाळू उपसा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:12+5:302021-06-16T04:30:12+5:30
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनसुार, पिकअप चालक किरण अनिल वाघमारे (रा. भटुंबरे, ता. पंढरपूर), रणजित श्यामराव इटकर (रा. जुना कऱ्हाड नाका, ...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनसुार, पिकअप चालक किरण अनिल वाघमारे (रा. भटुंबरे, ता. पंढरपूर), रणजित श्यामराव इटकर (रा. जुना कऱ्हाड नाका, पंढरपूर), बबलू प्रक्षाळे (रा. भटुंबरे, ता. पंढरपूर), विकास तानाजी जाधव (रा. पेनूर, ता. मोहोळ) यांनी संगनमत करून, भीमा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन केले.
या प्रकरणी वरील तिघांविरुद्ध पोलीस कर्मचारी शिवशंकर सोमांना हुलजंती यांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन लाख रुपये किमतीची नंबर नसलेली गाडी व तीन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक भोसले करीत आहेत.
-----
कासेगाव येथे जुगारावर कारवाई
कासेगावच्या शिवारात विठ्ठल देवस्थानचे जागेतील चिलाराच्या झुडपामध्ये भाग्यवंत किसन पवळ (वय ३७, रा. चिचोली, ता. सांगोला), तानाजी प्रकाश गवळी (रा. खर्डी, ता. पंढरपूर), समाधान दत्तात्रय होनमाने (वय २२, रा. तनाळी, ता. पंढरपूर), महादेव अनिल रणदिवे (२५, रा. अकोला, ता. मंगळवेढा), दिगंबर लक्ष्मण पवार (६०, रा. उंबरगाव, ता. पंढरपूर) हे सर्वजण गोलाकार बसून तीरट नावाचा जुगार शनिवारी खेळत होते. या दरम्यान त्यांच्यासमोर रोख रक्कम ११ हजार ५०० रुपये मिळून आली. वरील सर्वांविरुद्ध हणमंत गोरख भराटे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुजित उबाळे करीत आहेत.
-----
तीन ठिकाणी दारू जप्त
कासेगाव (ता. पंढरपूर) येथे तीन ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी देशी दारू जप्त केली आहे. यामध्ये सुनील धोंडिबा काळे (वय ४५, रा. रूपनर वस्ती, कासेगाव, ता. पंढरपूर) याच्याकडे एका वायरच्या पिशवीमध्ये ६७६ रुपये किमतीच्या देशी दारूच्या १३ बाटल्या शनिवारी मिळून आल्या, तसेच अतुल मधुकर रूपनर (४०, रा. रूपनर वस्ती, कासेगाव, पंढरपूर) याच्याकडे १ हजार ४० रुपये किमतीच्या २० देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. ज्ञानेश्वर मधुकर माेरे (४०, रा. तानाजी चौक, पंढरपूर, सध्या बेंदवस्ती, कासेगाव, ता. पंढरपूर) याच्याकडे १ हजार ४० रुपये किमतीच्या २० देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या असल्याचे पोलीस निरीक्षक अवचर यांनी सांगितले.
---