वाळूमाफियांकडून पोलिसांना धक्काबुक्की, आठ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:12+5:302021-04-13T04:21:12+5:30
११ एप्रिल रोजी रात्री १० वाजता सांगवी येथील बोरी हरणा नदीतून ट्रॅक्टर एमएच १३ बीआर २५९२ ट्रॉली क्रमांक ...
११ एप्रिल रोजी रात्री १० वाजता सांगवी येथील बोरी हरणा नदीतून ट्रॅक्टर एमएच १३ बीआर २५९२ ट्रॉली क्रमांक एमएच-१३ डीएम ५३७३ या मधून दीड ब्रास वाळू भरून जात होते. तेव्हा खबऱ्यामार्फत पोलीस फिर्यादी अंबादास भीमाशंकर दुधभाते व पोलीस नाईक गोडसे यांना याची माहिती मिळाली. दरम्यान, ते याच भागात पेट्रोलिंगसाठी फिरत होते. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता ट्रॅक्टर निघून गेले होते. त्याचा शोध घेत किणीमोड तांडा येथे गेले असता वाळूने भरलेले ट्रॅक्टर थांबले होते. ही गाडी कोणाची आहे असे विचारले असता पिंटू ऊर्फ पुत्रू चव्हाण, युवराज चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, जिजा पुत्रू चव्हाण, रवी बाबू राठोड, पुत्रू चव्हाण, सोमलाबाई चव्हाण, छाया पिंटू चव्हाण, सर्व रा. किणीमोड तांडा हे सर्वजण अंगावर धावून आले. काहींनी लाथाबुक्क्याने मारहाण करून दुचाकीचे १५ हजार रुपयांचे नुकसान केले. या सर्वांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा, वाळू चोरी, पर्यावरण नुकसान, पाचपेक्षा अधिक लोक एकत्रित येऊन दंगा करणे, अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.