कडलास येथे वाळूच्या टेम्पोची कारला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:23+5:302021-04-30T04:27:23+5:30

सांगोला : वाळू घेऊन निघालेल्या भरधाव वेगातील टेम्पोने कारला जोरात धडक दिली. या अपघातानंतर मार्ग चुकवून जाण्याच्या प्रयत्नात टेम्पाेतील ...

The sand tempo hit the car at Kadlas | कडलास येथे वाळूच्या टेम्पोची कारला धडक

कडलास येथे वाळूच्या टेम्पोची कारला धडक

Next

सांगोला : वाळू घेऊन निघालेल्या भरधाव वेगातील टेम्पोने कारला जोरात धडक दिली. या अपघातानंतर मार्ग चुकवून जाण्याच्या प्रयत्नात टेम्पाेतील वाळू बाहेर रस्त्यावर विखुरली. ही घटना २८ एप्रिल रोजी पहाटे ४च्या सुमारास सांगोला शहरात कडलास नाका येथे घडली.

जुनोनी येथील संजय जनार्दन कांबळे हे २८ एप्रिल रोजी पहाटे ३च्या दरम्यान गावातील अमृत नारायण पाटील यांच्या बहिणीला सोलापूर रेल्वे स्थानक येथून घेऊन येण्यासाठी कार (एमएच १३ बीएन २९१३)मधून विलास महागुडे यांना सोबत घेऊन निघाले होते. दरम्यान, पहाटे चारच्या सुमारास सांगोला शहरातील कडलास नाका येथून जात असताना कडलास रोडवरून वाळू भरून भरधाव वेगाने येणाऱ्या नंबर नसलेल्या टेम्पोने कारला जोराची धडक दिली. या अपघातानंतर टेम्पोचालक गाडी न थांबवता मुजावर गल्लीमधून भरधाव वेगात निघून गेला. यावेळी टेम्पोतील वाळू रस्त्यावर विखुरली. या अपघातात कारच्या बोनेटला जोराची धडक बसल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत संजय कांबळे यांनी टेम्पो चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: The sand tempo hit the car at Kadlas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.