कराटे स्पर्धेवर सांगलीचे वर्चस्व

By admin | Published: December 30, 2014 10:57 PM2014-12-30T22:57:54+5:302014-12-30T23:30:12+5:30

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व सांगली कराटे संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन

Sangli dominates karate competition | कराटे स्पर्धेवर सांगलीचे वर्चस्व

कराटे स्पर्धेवर सांगलीचे वर्चस्व

Next

सांगली : विभागीय शालेय कराटे स्पर्धेवर सांगली जिल्ह्याच्या खेळाडूंनी वर्चस्व मिळवले. कोल्हापूरला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व सांगली कराटे संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाधिकारी बी. शंकर यांच्याहस्ते झाले. विजेत्या खेळाडूंची शालेय राज्य कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम व द्वितीय असा अंतिम निकाल : १७ वर्षे मुले : ३५ किलो खालील : गणेश सुतार, अर्षद शेख (दोघे सांगली). ३५ ते ४० किलो : साहिल मुजावर (सांगली), शुभम वाघमारे (कोल्हापूर). ४० ते ४५ किलो : अभिषेक मोरे (सांगली), स्वप्नील कळंत्रे (कोल्हापूर). ४५ ते ५० किलो : विजय तोरणे (सातारा), इरफान जमादार (सांगली). ५० ते ५५ किलो : ओंकार शिंत्रे (कोल्हापूर). ५५ ते ६० किलो : धिरज मुल्ल्या (सांगली), शुभम जाधव (कोल्हापूर). ६० ते ६५ किलो : पृथ्वराज संकपाळ (कोल्हापूर). ७० किलोवरील : विश्वजीत भंडारे. १७ वर्षे मुली : ३२ किलोखालील : मुस्कान मुजावर (सांगली), अथर्वी पाटील (कोल्हापूर). ३६ ते ४० किलो : अंजली सुतार (सांगली), निकिता निकम (सातारा). ४० ते ४४ किलो : मिसबा गवंडी (कोल्हापूर), ऋतुजा कल्याणकर (सांगली). ४४ ते ४८ किलो : नम्रता चवथे , गायत्री भगत (दोघी सांगली).
१९ वर्षे मुले : ४५ ते ५० किलो : महेश राजगिरे (कोल्हापूर), सुनिल जाधव (सातारा), ५० ते ५५ : सूरज अतिग्रे (कोल्हापूर). ५५ ते ६० : सचिन पुरोहीत (कोल्हापूर), अमित पवार (सांगली). मुली : ४० ते ४४ किलो : मोबिना सनदी (सांगली). (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Sangli dominates karate competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.