सांगोला नगरपरिषद विविध विषय समित्या सभापती निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:18+5:302021-01-08T05:10:18+5:30

यावेळी नगराध्यक्षा राणी माने, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. सांगोला नगरपरिषदेत ६ जानेवारी रोजी तहसीलदार ...

Sangola Municipal Council elected various subject committee chairpersons | सांगोला नगरपरिषद विविध विषय समित्या सभापती निवडी

सांगोला नगरपरिषद विविध विषय समित्या सभापती निवडी

Next

यावेळी नगराध्यक्षा राणी माने, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

सांगोला नगरपरिषदेत ६ जानेवारी रोजी तहसीलदार तथा प्रशासन अधिकारी अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवक, नगरसेविकांची सभा झाली. महायुतीच्या राणी माने नगराध्यक्ष पदावर विराजमान आहेत. सांगोला नगरपरिषदेत नगरविकास आघाडी १२ व महायुतीचे ८ सदस्य आहेत. विषय समिती सभापती व सदस्य निवडी उर्वरित वर्षासाठी एकोपा निर्माण झाल्याने बिनविरोध पार पडल्याचे गटनेते आनंदा माने व गटनेते सचिन लोखंडे यांनी सांगितले. यावेळी उद्योगपती आनंद घोंगडे, राजू मगर, प्रा. प्रसाद खडतरे, संतोष चोथे, शहाबाज तांबोळी, महादेव पारसे, आदी उपस्थित होते.

Web Title: Sangola Municipal Council elected various subject committee chairpersons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.